ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली महायुतीकडून जनतेला गाजर, विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

मुंबई : राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. ‘शासन आपल्या दारी आले, मिळाले गाजर, ‘कांद्याचा करून वांदा, महायुतीने दिले गाजर’, ‘शेतकऱ्यांनी मागितली मदत, सरकारने दिले गाजर,’ ‘कापसाला पाहिजे होता हमीभाव, मिळाले गाजर, म्हणत सरकारच्या विरोधात विधिमंडळ परिसरात जोरदार निदर्शने केली. राज्यातील जनतेला विकासाचे दिवा स्वप्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम, आज पुन्हा देवेंद्र फडणवीसांना दिला इशारा!

जालना : विधिमंडळाच्या अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाबद्दल फडणवीसांच्या मनात द्वेष आहे. मला तुरुंगात टाकलं तर त्यांना कळेल मराठा समाज काय आहे ते. जसा कापूस फुटल्यानंतर संपुर्ण शेत पांढरं दिसतं तसं सर्वत्र मराठेच-मराठे दिसतील, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभा रणसंग्राम : नांदेडमध्ये पुन्हा भाजपचा झेंडा की महाविकास आघाडी खेळणार नवी खेळी?

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपची वाट धरल्यानंतर नांदेडमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठा बदल पाहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. नांदेडवर कंट्रोल असलेल्या अशोक चव्हाणांनंतर आता काँग्रेस दुसरा कोणता पर्याय उभा करणार की ही जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या घटक पक्षाकडे जाणार याबद्दलची उत्सुकता आहे. भविष्याचे अंदाज बांधण्यापूर्वी आधी इतिहासाकडे डोळसपणे पाहावं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बच्चू कडू यांना वाचवण्यासाठी सहकार कायद्यात सुधारणा : विजय वडेट्टीवार

X : @NalavadeAnant मुंबई: प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांचे थेट नाव न घेता, अमरावती बँकेतील कडू यांच्या काही व्यवहारांना संरक्षण देण्यासाठीच राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक आणल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हे विधेयक काळे विधेयक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. एखाद्या संस्थेत पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, मनमानी केली तर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे सर्व ४८ जागांवर एकमत – संजय राऊत

X : @NalavadeAnant मुंबई: राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झालेले असून कोणता पक्ष कोणती जागा लढविणार याचाही मसुदा तयार झाला आहे. त्यावर आता उद्या होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम केले जाईल आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटप घोषित केले जाईल, असेही ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तलाठी परीक्षा पेपर संदर्भातील घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा – नाना पटोले

मुंबई : तलाठी परीक्षेत पेपर संदर्भात झालेला घोटाळा हा मध्यप्रदेशात एकेकाळी झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते. तलाठी होऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न पटोले यांनी केला. सरकारच घोटाळा करते आणि सरकारच […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिळ्या कडीला ऊत आणणारा अंतरिम अर्थसंकल्प, 99 हजार कोटी राजकोषीय तूट म्हणजे दिवाळखोरीकडे वाटचाल; विरोधकांचे टीकास्त्र

मुंबई : अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधिमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आज सकाळपासूनच विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करीत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ‘राज्यातील शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्गीयांची फसवणूक करणारा अर्थहीन अर्थसंकल्प आज राज्य सरकारने सादर केला आहे. विकासाचे दिवास्वप्न दाखवणारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अर्थमंत्री अजित पवारांना सादर केलेला संपूर्ण अंतरिम अर्थसंकल्प एका क्लिकवर!

मुंबई : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांनी मांडला अंतरिम अर्थसंकल्प; या 10 महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत पवारांनी अर्थसंकल्प वाचनास सुरुवात केली आणि अर्थसंकल्पाचा शेवट कुसुमाग्रजांच्या एका कवितेतून केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा… मुलींसाठी लेक लाडकी योजना

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघडीच्या बैठकीला वंचितचे प्रतिनिधी लावणार हजेरी

पुणे : महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन […]