महाराष्ट्र ताज्या बातम्या

..तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा – काँग्रेसची आयोगाकडे मागणी 

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे, त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली असून आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी करून आदर्श आचारसंहितेचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांच्या खेळीने भाजपचा डाव फसणार ; उत्तम जानकर उद्या “तुतारी “हाती घेणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघातील माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी काही दिवसांपूर्वीच नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच बोललं जात असतानाच आता उत्तम जानकर यांनी राजकारणातले […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नारायण राणेंच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब, किरण सामंतांची माघार, लढत ठरली

रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघआतून नारायण राणे हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. तर किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलंय. महायुतीतला हा तिढा सामंजस्यानं सुटला असला तरी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला मिळणार, याचा सस्पेन्स मात्र गेले काही दिवस सुरु होता. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भाजपानं आपल्या गळाला […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

भगीरथ भालकेंचा पाठिंबा प्रणिती शिंदेंना, सोलापुरात राम सातपुतेंची वाट बिकट?

पंढरपूर – सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत होते आहे. दोन्ही तरुण उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत. यातच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आल्यानं, त्याचा फायदा आता प्रणिती शिंदे यांना होईल असं दिसतंय. प्रवेश करतानाच्या सभेत दादांच्या सांगण्यावरुन सातपुतेंना आमदार केलं. आता हे पार्सल बीडला पाठवायचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘…तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती’; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

सोलापूर : ‘देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो. 33 महिने आम्ही काय सहन केलंय, हे आम्हाला माहितीये. पण हेही दिवस जातील याची खात्री होती. आणि सुदैवाने ते दिवस गेले आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ‘ असं धक्कादायक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सोलापूर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

भाजपाला निवडणुकीत किती जागा मिळतील?, राहुल गांधींनी व्यक्त केला अंदाज, इंडिया आघाडीबाबत काय म्हणाले?

गाझियाबाद – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वतीनं 400 पारचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशभरात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपा आणि एनडीएचे नेते कार्यरत असल्याचं दिसतं आहे. भाजपानं हा 400 पारचा नेरेटिव्ह सेट केलेला असताना, आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करताना दिसू लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मविआ आणि महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन; सुप्रिया सुळे, उदयनराजे, सुनेत्रा पवार आज दाखल करणार अर्ज

मुंबई : आज महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करताना दोन्ही बाजूकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीकडून आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. अमोल कोल्हे, पुण्यातून रवींद्र धंगेकर हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे सुनेत्रा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवारांची जीभ घसरली, बीडच्या सभेत वादग्रस्त विधानं; विरोधकांकडून टीकेची झोड

पुणे : बुधवारी इंदापूर निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांनी जीभ सैल सुटल्याचा प्रकार पाहायला मिळाला. या सभेदरम्यान अजित पवारांनी अनेक वादग्रस्त विधानं केली, यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी इंदापूर तालुक्यात अनेक मेळावे घेतले. डॉक्टर, व्यापारी, वकील यांचे स्वतंत्र मेळावे घेण्यात आले. यावेळी भाषण करताना ते म्हणाले… १ आम्ही केलेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या मनसेकडून समन्वयक समिती जाहीर ;अमित ठाकरे ,बाळा नांदगावकरांचा समावेश

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे .त्यानंतर आता मनसेत हालचालींना वेग आला असून मनसेकडून महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारासाठी समन्वयक समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीत मनसेचे नेते, सरचिटणीस आणि राज्य उपाध्यक्ष यांचा समावेश आहे.यामध्ये. राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्रातील लढाई भाजपा विरुद्ध वंचित अशीच’, प्रकाश आबंडेकरांचं कार्यकर्त्यांना काय पत्र?

मुंबई- राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असं कार्यकर्त्यांना सांगताना ही लढाई केवळ भाजपा विरुद्ध वंचित अशीच असल्याचं त्यांनी म्हटलय. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे झालेले आहेत.काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, अशात केवळ वंचितच सक्षमपणे […]