ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेत चौरंगी लढत ; ठाकरेंची मशाल घेऊन सत्यजित पाटील -सरुडकर रिंगणात

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत चर्चेत ठरलेल्या हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर (Satyajit Patil Sarudkar )यांना या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)आणि शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उन्मेष पाटलांचा भाजपला धक्का ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन ; मातोश्रीवर जल्लोष

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना जळगावचे विद्यमान खासदार, उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते उन्मेष पाटील (Unmesh Patil )यांनी भाजपला रामराम करत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधले आहे . त्यांच्यासह पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. यावेळी मातोश्री परिसरात एकच जल्लोष करण्यात आला. उन्मेष पाटील यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार गटाच्या पाच जागांचे उमेदवार आज जाहीर होणार ; माढ्यात अन साताऱ्यात कोणाला उमदेवारी ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar)पक्षाकडून उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार जाहीर होणार आहेत . त्यामुळे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

केजरीवाल यांच्यासारखी वेळ उद्धव यांच्यावर येऊ शकते : नारायण राणे 

X : @therajkaran मुंबई: अमेरिका आणि इटलीचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करतात. मोदींमुळेच जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. २०३० मध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर येईल. भाजप (BJP) हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचे लोकसभेत ३०३ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर आम्ही चारशे पार पोहचू, असा आत्मविश्वास केंद्रीय मंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“ठाकरेंची शिवसेना पळवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में …… ” : संजय जाधव

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Election ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav)यांनी महायुतीविरुद्ध दंड थोपटले आहेत .यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde )यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (Shiv Sena) पळवून नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था आता ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ अशी झाली […]

मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही, नारायण राणेंच्या दाव्यानंतर महायुतीत खळबळ, विरोधकांनाही टीकेची संधी

मुंबई- रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपाचाच आहे, असं ठआसून सांगताना यात कुणी लुडबूड करु नये, असं वक्तव्य नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं. शिंदेंच्या शिवसेनेची ताकद किती आहे, असा प्रतिसवाल करत, मतदारसंघात भाजपाच वरचढ असल्याचं सांगताना राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मतदारसंघात नसल्याचं म्हटलय. पक्षानं उमेदवारी दिली तर नक्की आपण ही जागा लढवू आणि जिंकून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाला उमेदवार मिळेना? महाजन, शेलार की अळवणी?

मुंबई – उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन कोणताही वाद नसताना, या जागेवर पूनम महाजन या विद्यमान खासदार असतानाही या जागेवर अद्याप भाजपानं उमेदवार जाहीर केलेला नाही. पूनम महाजन यांच्याऐवजी नवा चेहरा रिंगणात उतरवण्यात येईल, असं सांगण्यात येत होतं. मात्र अद्यापपर्यंत भाजपाला या जागेवरुन उमेदवार मिळत नसल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा मुंबई भाजपाचे अध्यक्ष […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले काही तास, तरीही यवतमाळमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना, भावना गवळींचं काय होणार?

नागपूर- यवतमाळ वाशिम लोकोसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असणार, याचं गूढ अद्यापही कायम आहे. पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळी या जागेसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे मंत्री संजय राठोड यांचंही नाव चर्चेत आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास उरलेले असतानाही अद्याप याबाबत निर्णय झालेला नाहीय. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी उमेदवारी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

हेमंत पाटील यांचे मुंबईत वर्षासमोर शक्तिप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आश्वासन?

मुंबई- हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केलंय. यावेळी वर्षा बंगल्याच्या परिसरात हेमंत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यापाठोपाठ हेमंत पाटील यांच्या समर्थकांनीही तिकिटासाठी वर्षा बंगल्याबाहेर शक्तिप्रदर्शनाचा मार्ग स्वीकारल्याचं दिसतंय. तर या शक्तिप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शइंदे यांनी हेमंत पाटील यांच्यावर कोणताही अन्याय […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

चंद्रपुरात मुनगंटीवारांना महायुतीतूनच आव्हान?, का संतापलेत मुनगंटीवार?

नागपूर – चंद्रपुरात भाजपाचे उमेदवार असलेले भआजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मतदारसंघात महायुतीतूनच बळ मिळत नसल्याचं दिसतंय. या मतदारसंघातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे अद्याप मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेले नाही. इतकंच काय तर जोरगेवार यांचे साथीदार उघडपणे मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना दिसतायेत. याबाबत मुनगंटीवार यांना विचारणा केली असता त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. काय […]