ताज्या बातम्या महाराष्ट्र

“ठाकरेंची शिवसेना पळवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था बेगानी शादी में …… ” : संजय जाधव

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Election ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार संजय जाधव (Sanjay Jadhav)यांनी महायुतीविरुद्ध दंड थोपटले आहेत .यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde )यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना (Shiv Sena) पळवून नेणाऱ्या मुख्यमंत्र्यांची अवस्था आता ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ अशी झाली आहे. ते शिवसेना घेऊन गेले मात्र ते टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांना पेलावं लागणार आहे असा टोला देखील त्यांनी लगावला आहे .

आज परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिवसेनेला धनुष्यबाण मिळून देणारा जिल्हा असताना मुख्यमंत्र्यांना याठिकाणी उमेदवार देता आला नाही, ही मुख्यमंत्र्यांची सगळयात मोठी हार आहे . वाशिम, रामटेक, हिंगोली अजून अनेक ठिकाणी यांची वाईट अवस्था झालीय. मात्रं आम्ही परभणीची जागा ही जिंकणारच तसेच राज्यभरामध्येही भाजपपेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वास परभणी लोकसभेचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.तसेच “उद्धव ठाकरे हे कसलेले पैलवान आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे ते वंशज आहेत. विरोधी पक्षाला कशी वागणूक द्यायची आणि कशी वागणूक घ्यायची, हे ते जाणतात. त्यांनी भाजपाला त्यांच्या काळात कधी लुडबुड करू दिली नाही. ज्यादिवशी असे वाटले, त्याच दिवशी ते बाहेर पडले. आता त्यांनी आम्हाला संपविण्याचा घाट घातला, पण आता तेच बेजार आहेत. चार पाच पक्ष गोळा करून सुद्धा भाजपाला निवडणुका जिंकता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, अशी अवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली”, असा हल्लाबोल संजय जाधव यांनी केला.

या मतदारसंघासाठी सलग तिसऱ्यांदा अर्ज दाखल करून मी आज महाविकास आघाडीचा विजय होणार असल्याचं ठाम सांगतो . महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय होणार. तीच निष्ठा आणि तोच ऐक्याचा झेंडा हाती घेत आज परभणी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी, मला समर्थन दर्शवण्यासाठी तुम्हा सर्वांची अलोट गर्दी पाहून भारावून गेलो.”एवढ्या मोठ्या संख्येनं असणारी तुमची उपस्थिती क्रांतीची मशाल घेऊन येथे अवतरली. आजवर तुमचं प्रतिनिधीत्व करताना कुठेही कसूर ठेवली नाही. वाघाचे छावे इथल्या रस्त्यांवरती चालते झाले आणि त्याच क्षणी विरोधकांना धडकी भरली. असा हल्लाबोल त्यांनी चढवला .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात