ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार ; आमदार प्रकाश आवाडे सुद्धा रिंगणात

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अनेक इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यापार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha constituency) राजकीय घडामोडीना वेग आला आहे .या मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे . त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज ठाकरेंना पुन्हा धक्का ; कीर्तिकर शिंदेनंतर डोंबिवलीतील 7 पदाधिकाऱ्यांचाही मनसेला रामराम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी गुडीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांना पक्षातून धक्यावर धक्के बसत आहेत . त्यांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी पसरली आहे . याआधी मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा आणि सदस्यत्वचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीतील (Dombivli) मनसेचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात शरद पवारांचा डाव ; भाजपवर नाराज असेलेले मोहिते पाटील महायुतीचा खेळ बिघडवणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha ) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अखेर डाव टाकला आहे . या मतदारसंघातील भाजपवर नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आता बंडाच निशाण हाती घेतलं असल्यामुळे महायुतीचा (MahaYuti )खेळ बिघडणार आहे . कारण मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, शाहा-राज यांच्या भेटीत नेमकं काय घडलं होतं?

मुंबई– राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात, अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, हे स्पष्ट झालेलं आहे. विधान परिषद आणमि राज्यसभेची जागा नको, असं सांगत बिनशर्त पाठिंबा राज ठाकरेंनी जाहीर केला असला तरी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीकडून त्यांची मोठी अपेक्षा असेल, याचे संकेत त्यांनी दिलेत. पक्ष […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीचा नाशिकमध्ये नवीन पवित्रा

भुजबळ- गोडसे पिछाडीवर कोकाटे- बोरस्ते- ढिकले आघाडीवर X: @ajaaysaroj भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीमधील नाशिकचा तिढा काही केल्या सुटेना, एकही पक्ष मागे हटेना, अशी बिकट परिस्थिती जागावाटपात निर्माण झाली असतानाच महायुतीच्या नेत्यांनी इथे नवीन पवित्रा घेतला आहे. महायुतीने आता छगन भुजबळ, हेमंत गोडसे यांच्या ऐवजी राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे आणि अजय बोरास्ते यांच्या नावाची चाचपणी सुरू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदेंचे संजय शिरसाट राज ठाकरेंच्या भेटीला ; शिवतीर्थावर तब्बल तासभर खलबत

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray ) महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चाना काही दिवसापूर्वीच पूर्णविराम मिळाला असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर जाऊन त्यांची भेट घेतली आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असल्याची माहीत समोर आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे . या बैठकीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांसमोर नवा पेच ; हेमंत पाटील, धैर्यशील मानेचा पत्ता कट होणार ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना आता महायुतीसमोर जागेवरून (Mahayuti Seat Sharing)नवा पेच निर्माण झाला आहे . महायुतीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ किंवा १३ जागा येणार असल्याची माहीती समोर आली आहे . मात्र शिंदेच्या शिवसेनेने आतापर्यंत फक्त आठ उमेदवार जाहीर केले आहेत . त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महायुतीचा मास्टरप्लॅन ; शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता बीडच्या जय शिवसंग्राम पक्षातही फूट

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे . शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता बीडमधील विनायक मेटे (Vinayak Mete)यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम (Shiv Sangram)संघटनेत देखील फूट पडणार आहे . त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. आता या लोकसभेसाठी एकजण महाविकास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Lok Sabha : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! एका क्लिकवर वाचा राजकीय समीकरण!

मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून घटकपक्षांसह जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांसह संभाव्य उमेदवारांचेही जीवही टांगणीला लागले आहे. दरम्यान महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाचा आकडा सूत्रांकडून सांगण्यात आला आहे. यानुसार, महायुतीचे जागावाटपासह उमेदवारांची नावंही ठरली असल्याचं सांगितलं जात आहे. २८ मार्च, गुरुवारी म्हणजे उद्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कोकणातला राजकीय शिमगा सुरुच, महायुतीची उमेदवारी कुणाला? अद्यापही गुलदस्त्यात; राणे-जठार की सामंत सगळेच वेटिंगवर

मुंबई- कोकणात शिमगोत्सवाला विशेष महत्त्व आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच चाकरमानी शिमगोत्सवाला गर्दी करताना दिसले. शिमगोत्सवाच्या या उत्सवात आणि उत्साहात, कुजबूज होती ती लोकसभा निवडणुकीची. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कुणाला मिळणार, याची चर्चा सगळशीकडं रंगल्याचं पाहायला मिळालंय. राज्यात भाजपाच्या २३ उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी अद्यारपही रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार कोण, हा सस्पेन्स मात्र कायम दिसतोय. शिमगोत्सवाच्या निमित्तानं […]