ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचं ठरलं; सरकारला इशारा

जालना राज्य सरकारने काल विशेष अधिवेशन घेत मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेतलं. मात्र मनोज जरांगे पाटील सरकारच्या या निर्णयावर नाराज आहेत. आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको, तर ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. आम्हाला सरकारचे आरक्षण मान्य नाही. आता आमच्यापुढे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर जरांगे पाटील ठाम, आंतरवालीत उद्या बोलावली बैठक

जालना विधिमंडळात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केलं असलं तरीही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात उद्या आंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असून यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठ्यांचं स्वप्न पूर्ण होणार? मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन

मुंबई राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले जाणार आहे. अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण दिलं जाणार असल्याने कुणबी एकत्रीकरण समिती आक्रमक झाली आहे. त्यामुळे या अधिवेशनावरुन काही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस लक्ष ठेवून आहेत. मागासवर्ग आयोगाने राज्यभरात मराठा समाजाचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, स्वतःच्या शरीराचा त्याग करण्यात काहीही अर्थ नाही’; प्रकाश आंबेडकरांचा पाटलांना सल्ला

मुंबई आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे, असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असे वंचित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मी मेलो तर या सरकारला सोडू नका’ मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन, आज उपोषणाचा पाचवा दिवस

जालना मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल १४ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी जरांगे पाटलांना जबरदस्तीने सलाईन लावून उपचार सुरू केले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम, आपली औकाद आणि…’; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई मराठा आरक्षणासाठी गेल्या ५ दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या धक्कादायक पोस्टमुळे मराठा बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज सकाळपासून जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. मराठा बांधवांकडून त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्त्राव, प्रकृती खालावली; आज उपोषणाचा 5 वा दिवस

जालना मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसात त्यांनी पाणीही घेतलेलं नाही. आज त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी विनंती करूनही ते अन्न-पाणी घेण्यास तयार नसलयाचं सांगितलं जात आहे. दरम्यान सराटीत मराठा बांधवांची गर्दी जमा व्हायला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आज उपोषणाचा तिसरा दिवस

जालना मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. कालपासून पाटलांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारपासून जरांगे स्टेजवर झोपून आहेत. तपासणी डॉक्टर आले असता पाटलांनी तपासणी करून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, 10 फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार

मुंबई मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. येत्या १० फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा आज आंतरवली सराटीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी केली आहे. सोशल मीडियावर माझ्याविरोधात बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून सुपारी घेतली आहे, असा दावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीत धुसफूस, भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची मागणी मान्य केल्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असला तरी ओबीसी समाजाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत […]