विश्लेषण महाराष्ट्र

महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली!

X : @vivekbhavsar गेल्या आठवड्यात एक डॉक्टर भेटले. मूळचे परभणीचे, माळी समाजाचे. राज्यातील लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला आणि खंत व्यक्त केली. बालपणापासूनच तिघे मित्र, त्यातील दोघे मराठा समाजाचे. एकत्रच लहानाचे मोठे झालेले, घराच्या छतावर एकत्र बसून पार्टी करणारे, गप्पात एकमेकाची टिंगल करणारे हे मित्र. त्यातील एकाने व्हॉट्सअँप स्टेटस् ठेवलेलं. हा डॉक्टर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्त्राव, प्रकृती खालावली; आज उपोषणाचा 5 वा दिवस

जालना मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसात त्यांनी पाणीही घेतलेलं नाही. आज त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी विनंती करूनही ते अन्न-पाणी घेण्यास तयार नसलयाचं सांगितलं जात आहे. दरम्यान सराटीत मराठा बांधवांची गर्दी जमा व्हायला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची गरज का? ओबीसी नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोडांचा सवाल

मुंबई ज्या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा सर्व्हेक्षणाचा अहवाल आल्यानंतर १५ फेब्रुवारीच्या दरम्यान विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे. परंतु या विशेष अधिवेशनाची गरज काय असा सवाल ओबीसी नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी उपस्थित केला आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने जो सर्वे केला त्यातून दोन गोष्टी मिळणार आहेत. एक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीत धुसफूस, भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; शिंदे गटाच्या दोन आमदारांची मागणी

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना ओबीसींमधून आरक्षण आणि सगेसोयऱ्याची मागणी मान्य केल्यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला असला तरी ओबीसी समाजाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षणाची अधिसूचना’, 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन

मुंबई ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे,’ असा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘पण मराठा आरक्षण कुठे आहे?’ निलेश राणेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

मुंबई मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या मागण्यांवर राज्य सरकारने अधिसूचना काढून मराठा समाजाला आरक्षणाची दार उघडून दिली. या अधिसूचनेवर ओबीसी समाजातील नेत्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे. आता नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी मराठा आरक्षण कुठे आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. शोधा कुणबी समाजाच्या नोंदी पण नाव मराठा आरक्षण? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आंदोलन अजून संपलेलं नाही, ‘या’ समाजासाठीही लढा उभारणार, रायगडावरुन जरांगे पाटलांची मोठी घोषणा

रायगड मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या लढ्याला यश आल्यानंतर आज ते रायगड दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मसुदा जारी केला. यानंतर मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी काम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाच्या जाहिरातीवर ओबीसींचा आक्षेप, राज्यभरातून निवेदने

मुंबई राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचं काम सुरू आहे. आयोगाने यासंदर्भात एक जाहिरात केली असून यानुसार मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवाव्यात. या जाहिरातीवर ओबीसी समाजाने आक्षेप घेतला असून राज्यभरातून निवेदन दिले जात आहेत. राज्य सरकार नियुक्त न्या. संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित समिती […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

६ डिसेंबरनंतर राज्यात दंगली होतील, प्रकाश आंबेडकर यांचा पुनरुच्चार

Twitter : @therajkaran मुंबई राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने भाष्याने राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात दंगली उसळतील या त्यांच्या विधानानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांवर थेट एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील काही भागात मुस्लिमांना लक्ष्य केले जात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आधी मदत द्या त्यानंतरच दौरे करा : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्तं कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. टिळक […]