रायगड
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या लढ्याला यश आल्यानंतर आज ते रायगड दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मसुदा जारी केला. यानंतर मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे. धनगर, मुस्लीम या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा उभारणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
रायगड दौऱ्यादरम्यान ते येथील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहे. यानंतर उद्या ३१ जानेवारी रोजी तब्बल पाच महिन्यांनी आपल्या घरी परतणार आहेत.