ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आमदारांनीच मंत्रालय प्रवेशद्वाराला ठोकले टाळे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणावरून (Maratha reservation) राज्यातील वातावरण तापले असताना त्याचे लोण बुधवारी थेट मंत्रालयापर्यंत पोहचले. आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी सकाळी साडे दहा, अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घोषणा […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उध्दव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काडीमात्र नैतिक अधिकार  ठाकरे नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला देखील माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहेत, अशा संतप्त शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना थेट उध्दव ठाकरेंवर प्रहार केला. त्यावेळी यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात इंपेरिकल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

मराठा आंदोलनाच्या आडून हिंसाचार: देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सकारात्मकच आहे. मात्र, राज्यात मराठा आंदोलनाच्या असून हिंसाचार सुरु असल्याचा आरोप करत हिंसाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा सणसणीत इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे आंदोलन सुरु आहे त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

.. तर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसह सर्व ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा : उध्दव ठाकरे

Twitter : मुंबई मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारची महत्वाची भूमिका आहे, त्यामुळे जेव्हा केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये मांडावा. जर एवढेही करून देखील पंतप्रधानांवर परिणाम होणार नसेल तर सर्वपक्षीय ४८ खासदारांनी राजीनामा देत दबाव गट तयार करावा, महाराष्ट्र एकजुटीची हीच वेळ आहे, असे आवाहन ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या (cabinet meeting) बैठकीत स्वीकारण्यात आला. अहवाल स्वीकृत केल्यानंतर  मराठवाड्यात (Marathwada) कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi caste certificate) देण्याची कार्यवाही तातडीने सुरू […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकीय व्यवस्था भंपक …तुम्ही उपोषण थांबवा – राज ठाकरे

Twitter : @therajkaran मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना उपोषण सोडण्याची पत्रातून विनंती केली आहे. इथली राजकीय व्यवस्था भंपक असून त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासन विसरणार अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

मराठा आरक्षणाचा इतिहास आणि वर्तमान

Twitter : @vivekbhavsar मुंबई मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढतो आहे. लाखोंच्या संखेने ५८ मोर्चे शांततेत काढणार मराठा समाज आज अस्वस्थ आहे, सरकार आपली फसवणूक करतो आहे अशी शंका या समाजाला यायला लागली आहे. तशात काही नेत्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यातून मराठा समाज आणखीच बिथरला आणि काल बीड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. […]

मुंबई ताज्या बातम्या

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला मुंबईतून जोरदार पाठिंबा

Twitter : @therajkaran मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण सुरु केले असून जरांगे- पाटील यांनी ‘कुठे असाल तिथे उपोषणाला बसा’ असें आवाहन कालच समाजाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत मराठा समाज एकवटत आहे. पवई येथील सकल मराठा समाजाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. यात आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये : मुख्यमंत्री 

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती भोसले, गायकवाड आणि शिंदे यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण

Twitter @abhaykumar_d नांदेड मराठा आरक्षण प्रकरणी मराठवाड्यात जागोजागी आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांच्या घरी जाळपोळ करण्यात आली तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घराच्या काचाही संतप्त आंदोलकांनी फोडल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा […]