ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’, शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’; विरोधकांकडून सरकारचा जोरदार निषेध

X : @NalavadeAnant मुंबई : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशीही आक्रमक झाले. महाविकास आघाडीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ ‘तरुणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्सचा बाजार’ ‘शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विरोधकांनी आज का राज गुंडाराज,गुंडांना पोसणाऱ्या,राजकीय आश्रय […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा…..!

X : @NalavadeAnant मुंबई : ‘राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत असताना काय या राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला पडला आहे. सत्ताधारी आमदारच पोलीस ठाण्यात, गणेशोत्सव मिरवणुकीत गोळीबार करतात. मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येतात. या सर्व घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जरांगेंचा बोलविता धनी कोण? बैठका कोणी घेतल्या? वॉररूम कुणी स्थापन केल्या? फडणवीस विधानसभेत बरसले!

मुंबई मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. आज दोन्ही सभागृहाची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वादग्रस्त चर्चेतून झाली. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जीवे मारण्याचा गंभीर आरोप केला. याशिवाय त्यांनी फडणवीसांविरोधात अपशब्दांचाही वापर केला होता. यावरुन सभागृहात गोंधळ उडाला आणि […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी करण्याचे निर्देश

मुंबई : विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन गोंधळ उडाला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. आमदार आशिष शेलारांनी सभागृहासमोर औचित्याचा मुद्दा सादर केला. जरांगेंचा बोलविता धनी कोण?भाजप नेते आशिष शेलार यांनी जरांगेंचा बोलविता धनी कोण, याची सखोल चौकशी करावी. यासाठी एसआयटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘हिंमत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणं झालं ते जाहीर करा’ – नाना पटोले

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या आरोपानंतर जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरुन आता नाना पटोले यांनी राज्य सरकारला एक सवाल उपस्थित केला आहे. ‘हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद

जालना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात पुढील १० तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छं. संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलकांची उद्या निर्णायक बैठक, दुपारपर्यंत रास्तारोको नंतर धरणे आंदोलन

जालना आज गावागावत होणारं रास्ता रोकोचं रुपांतर धरणे आंदोलनात करा, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे. नाशिकमध्ये बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे रास्ता रोको न करता गावांत धरणे आंदोलन करण्याचं आवाहन मराठा बांधवांना करण्यात आलं आहे. त्याशिवाय मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना अडचण नको म्हणून आंदोलनात बदल करण्यात आल्याचं जरांगे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलन हिंसक झाले तर कोण जबाबदार? पाटलांना उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला मनोज जरांगे पाटील यांनी विरोध दर्शविला असून आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको ही भूमिका मांडली. यानंतर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २४ फेब्रुवारीपासून मोठं आंदोलन सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने कडक भूमिका अवलंबली आहे. मराठा आंदोलन समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहे? आंदोलन हिंसक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आंदोलन धोक्यात? बारस्करांनंतर संगीता वानखेडेंचे जरांगेवर धक्कादायक आरोप

X: @therajkaran मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वासू सहकारी अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर धक्कादायक आरोप केला. त्यानंतर आज पुन्हा जरांगेंच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांच्या आरोपानंतर मराठा आंदोलन धोक्यात सापडल्याची चिन्हं आहेत. संगीता वानखडे या एकेकाळी मराठा आंदोलनात जरांगे पाटील यांच्या सहकारी होत्या. यावेळी त्यांनी जरांगेंवर घणाघाती हल्ला चढवला. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जिवलग मित्राच्या आरोपानंतर काय म्हणाले जरांगे पाटील?

जालना किर्तनकार आणि जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे हेकेखोर आहे आणि गुप्त बैठक घेत असल्याचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर केला. यावर जरांगेंनी आपली भूमिका मांडली. अजय बारस्कर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. बारस्करने पैसे घेतल्याचा […]