X : @NalavadeAnant
मुंबई : ‘राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत असताना काय या राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला पडला आहे. सत्ताधारी आमदारच पोलीस ठाण्यात, गणेशोत्सव मिरवणुकीत गोळीबार करतात. मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येतात.
या सर्व घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात २८९ अनव्ये मांडलेल्या प्रस्तावावर राज्यातील कायदा व सुव्यस्थेच्या गंभीर प्रश्नांबाबत गंभीर बनत चाललेल्या परिस्थितीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर काही गुंड त्यांच्यासोबत फोटो काढतात.पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर सत्ताधारी आमदार त्याला हिंदू डॉनची पदवी देतात. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला जातो. गोळीबार झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या शहरप्रमुखाचे स्वागत केले जाते.माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली जाते. या सर्व घटना पाहता राज्यात सामान्य माणूस सुरक्षित नसून गुंड सुरक्षित असल्याची भावना जनमानसात असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते दानवे यांनी यावेळी सभागृहाचे लक्ष वेधले.त्याचवेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभागृहात लावून धरली.
हे ही वाचा – जरांगेंचा बोलविता धनी कोण? बैठका कोणी घेतल्या? वॉररूम कुणी स्थापन केल्या? फडणवीस विधानसभेत बरसले!