विश्लेषण महाराष्ट्र

महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली!

X : @vivekbhavsar गेल्या आठवड्यात एक डॉक्टर भेटले. मूळचे परभणीचे, माळी समाजाचे. राज्यातील लोकसभा निवडणूक निकालावर बोलताना त्यांनी एक अनुभव सांगितला आणि खंत व्यक्त केली. बालपणापासूनच तिघे मित्र, त्यातील दोघे मराठा समाजाचे. एकत्रच लहानाचे मोठे झालेले, घराच्या छतावर एकत्र बसून पार्टी करणारे, गप्पात एकमेकाची टिंगल करणारे हे मित्र. त्यातील एकाने व्हॉट्सअँप स्टेटस् ठेवलेलं. हा डॉक्टर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यसभेवर भाजपकडून मराठा – ओबीसी आणि महिलेला संधी

@vivekbhavsar मुंबई  राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ओबीसी, मराठा आणि महिलेला संधी दिली जाणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्राने दिली. यातील एक उमेदवार मराठवाड्यातील तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातील असेल, अशी माहिती मिळते आहे.  महाराष्ट्र कोट्यातून निवडून आलेले आणि केंद्रात परराष्ट्र राज्यमंत्री असलेले व्ही मुरलीधरण हे त्रिवेंद्रम पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जरांगेंचा महामोर्चा मुंबईच्या मार्गावर, 26 जानेवारीला ओबीसीही गाढवं, डुकरं घेऊन होणार दाखल

मुंबई पुण्यात जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण आंदोलन करण्यापासून मनोज जरांगेंना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा आंदोलक उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. याशिवाय ओबीसी महासंघानेही जरांगे पाठोपाठ मुंबईत येऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे. आम्हीही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाच्या जाहिरातीवर ओबीसींचा आक्षेप, राज्यभरातून निवेदने

मुंबई राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचं काम सुरू आहे. आयोगाने यासंदर्भात एक जाहिरात केली असून यानुसार मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवाव्यात. या जाहिरातीवर ओबीसी समाजाने आक्षेप घेतला असून राज्यभरातून निवेदन दिले जात आहेत. राज्य सरकार नियुक्त न्या. संदीप शिंदे समिती ही फक्त मर्यादित समिती […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हरिभाऊ राठोडांचा ‘तो’ फॉर्म्युला मराठा आरक्षणाचा वाद सोडवणार? जरांगे पाटीलही सकारात्मक?

मुंबई मराठा समाजाला ओबीसीमध्ये 9 टक्के आरक्षण देण्याचा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिलेला फॉर्म्युला मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळल्याची चर्चा सुरू असताना आता जरांगे पाटील याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून येत आहे. सध्या जरांगे पाटील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राठोड यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खबरदार.. आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange – Patil) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून निर्णय दिला तर पुढची पायरी आहेच : जयंत पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई निवडणूक आयोगात गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग आमचे मुद्दे ग्राह्य धरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) काही निकल आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसी समाजाला गृहीत धराल तर गंभीर परिणाम होतील – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation) देण्याबाबत ओबीसी समाजाचा आक्षेप नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणीही वाटेकरी होऊ नये, अशी ओबीसी समाजाची भावना आहे. पण सरकार जर ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार असेल तर ओबीसी समाज शांत राहणार नाही. सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड इशारा विधानसभेचे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जातनिहाय जनगणनेचा कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर करावा -विजय वडेट्टीवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न  प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना (Caste-wise census) हाच एक उपाय आहे.  त्यामुळे बिहारच्या (Bihar) धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जातनिहाय जनगणना […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]