ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोखे जगातील सर्वात मोठा घोटाळा; अर्थमंत्र्यांचे पती अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर यांचं मोठं विधान; सरकारवर थेट टीकास्त्र

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे पती आणि अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी निवडणूक रोखे प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. निवडणूक रोखे हा देशातील सर्वात मोठा नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. रिपोर्टर टीव्ही या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, निवडणूक रोखे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय गायकवाडांचा उमेदवारी अर्ज अन् प्रतापराव जाधवांच्या नावाची घोषणा, बुलढाणा जागेवरुन शिंदेंसमोर मोठा पेच

बुलढाणा : शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पक्ष आदेश न मानता संजय गायकवाडांनी तडकाफडकी जाऊन लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे बुलढाणा जागेवरुन शिंदे गटात मोठा पेच निर्माण झाला आहे. आमदार संजय गायकवाड आपला अर्ज मागे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

फ्लॉप अभिनेत्याला घेऊन एकनाथ शिंदेंची रणनीतीही होणार ‘फ्लॉप’?

मुंबई : चिरंजीव अमोल किर्तीकर यांच्याविरोधात उभं राहणार नाही आणि वयाचं कारण देत गजानन किर्तीकर यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर शिंदे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी चाचपणी सुरू झाली होती. आज गोविंदाने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तो उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र एकेकाळी जनतेची धकधक वाढवणारा हा अभिनेता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, एकनाथ शिंदेंच्या सुपूत्राचं नाव नाही; चर्चेला उधाण

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ८ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. मात्र पहिल्या यादीत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरातून संजय मंडलीक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे आणि हातकणंगलेमधून धैर्यशिल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Buldhana Lok Sabha : बुलढण्यात आमदार गायकवाड यांचा अर्ज दाखल, शिवसेनेत खळबळ, खासदार जाधवांना आव्हान

X: @ajaaysaroj मुंबई : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेनेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष धनंजय बोराटे, शहराध्यक्ष गजेंद्र दांडे उपस्थित होते. त्यामुळे पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावरच खासदार प्रतापराव जाधवांना डावलून हा अर्ज दाखल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतूनच गायकवाड यांना जाधव यांच्या विरोधात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चेतन नरके कोल्हापुरातूनच लढणार : मातोश्रीवरून आलेला प्रस्ताव फेटाळला

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election )वारे वाहू लागल्यापासून गोकुळचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके (Chetan Narake) यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातुनच निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांची डॉ. चेतन नरके यांनी भेट घेतली होती. या भेटीत नरके यांना हातकणंगले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संजय राऊतांवर बोलणं म्हणजे घाणीत दगड मारल्यासारखं ; शिरसाटांचं टीकास्त्र

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे . सत्त्ताधारी आणि विरोधकांमध्ये जागावाटपावरून , उमेदवारीवरून खटके उडत आहेत .सांगलीत ठाकरे गटाकडून (Thackeray )देण्यात आलेल्या चंद्रहार पाटलांच्या (Chandrahar Patil) उमेदवारीवर महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) वादाची ठिणगी पडली आहे .च्ंद्रहार पाटीलच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करत, विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांनी उमेदवारीचा दावा ठोकला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना साताऱ्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महायुतीतून सातारा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार( Sharad Pawar) हे पृथ्वीराज चव्हाणांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विकासासाठी अडसुळ आणि बच्चू कडूंनी एकत्र यावं ; नवनीत राणाच आवाहन

मुंबई : भाजपने महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना डावलून अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रचंड विरोध केला आहे. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी काम करणार असल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपला धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाचा केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यास नकार

मुंबई : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक झालेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे .सामाजिक कार्यकर्ते सुरजित सिंह यादव (Surjeet Singh Yadav)यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती . अखेर ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालय राष्ट्रपती राजवटीचा आदेश देऊ शकत […]