मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना साताऱ्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महायुतीतून सातारा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार( Sharad Pawar) हे पृथ्वीराज चव्हाणांच्या रुपाने हुकूमाचा एक्का बाहेर काढण्याची शक्यता आहे . त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांच्यात काटे कि टक्कर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील हे प्रतिनिधित्व करीत आहेत. पण त्यांचे वयोमान पहाता ते निवडणूक लढतील का ? याविषयी शंका आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवारी निश्चित करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. अजून उमेदवार ठरलेला दिसत नसला तरी मात्र शरद पवार हे ऐनवेळी इंडिया आघाडीतून अनुभवी सर्वसमावेशक, सक्षम असे पृथ्वीराज चव्हाण यांचे हुकमी पान बाहेर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान लोकसभेचे वारे वाहू लागले असताना साताऱ्यात दावे प्रतीदाव्यानं जोर आला आहे . जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून तेही या जागेवर दावा करीत आहेत. तसेच राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने अजित पवार गटही या जागेवर दावा करत आहे. सध्या भाजपकडून उदयनराजे भोसले यांचे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील किंवा पुत्र सारंग पाटील तर अजित पवार राष्ट्रवादी कडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव अशी नावे समोर येत आहेत.
दरम्यान काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी निवडून येतील असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते.त्यामुळे त्यांच्या नावाची सातारा लोकसभा मतदारसंघात चर्चा होत आहेत. तर सातारा लोकसभा लढविण्यास आपण इच्छुक आहात का या असा प्रश्न चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी विचारण्यात आला होता. तेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असुन आम्ही या मतदारसंघात भाजपाला घुसू देणार नाही ,आघाडी ताकतीने लढेल असे त्यांनी सांगितले होते . आता शरद पवारांचा हुकमी एक्का साताऱ्यातील मैदान आखणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .