ताज्या बातम्या महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha: भाजपकडून खानदेशमध्ये नारीशक्तीचा हुंकार: स्मिता वाघ उतरल्या रिंगणात

X: @therajkaran भाजपने जळगाव लोकसभा (Jalgaon Lok Sabha) मतदारसंघासाठी नारी शक्तीचा हुंकार भरला आहे. गेल्यावेळी हुकलेली संधी यंदाच्या निवडणुकीत स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्याकडे चालून आली आहे. भाजपने लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आणि मावळते खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचे तिकीट कापण्यात आले आहे. गेल्यावेळी पाटील हे चाळीसगाव विधानसभेसाठी इच्छुक होते. पण […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सीएएवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना काय दिले आव्हान?

X: @therajkaran सीएए म्हणजेच (CAA) नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यावर पहिल्यांदाच जाहीर बोलले आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धारेवर धरले आहे. भाजपने आपले अपयश झाकण्यासाठी हा कायदा आणल्याची टीका ठाकरेंनी केली होती. याला आता थेट आव्हान देत केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेपुढे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

Amit Shah: सीएए कायदा मागे घेणार नाही, अमित शाहांची ठाम भूमिका, ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आता राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. सीएए मागे घेततला जाणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांतील हिंदू, शिख, बौद्ध, ख्रिश्चन शरणार्थींना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा कायदा असल्याचं त्यांनी सांगितलंय. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात २३ टक्के आणि […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

अहिल्या नगरची लढत ठरली, सुजय विखे पाटील यांच्यासमोर मविआकडून निलेश लंकेंचं आव्हान, आज होणार पक्षप्रवेश?

मुंबई- नगरसाठी बुधवार महत्त्वाचा ठरला. दोन महत्त्वाचे निर्णय एकाच दिवशी झाले. अहमदनगर हे शहराचं नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तर यानंतर थोड्याच वेळात अहिल्यानगर खासदारकीच्या भाजपाच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अपेक्षेप्रमाणे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. या उमेदवारीसाठी राम शिंदे, राम सातपुते अशी भाजपातील इतरही काही नेत्यांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचं काय?

मुंबई- भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा २०१९ पासूनचा सुरु असलेला राजकीय वनवास अखेर संपला आहे. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना खासदारकीचं तिकिट मात्र नाकारण्यात आल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास त्यांची पुढची कारकिर्द आता दिल्लीत दिसण्याची शक्यता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

किर्तीकरांच्या घरात ‘कलह’, गजानन किर्तीकर नाही तर कोण असेल महायुतीचा उमेदवार?

दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या तिकीटावरुन बाप लेकामध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातून बाप-लेकामध्ये लढत होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

भारत न्याय यात्रेमुळं काँग्रेस-मविआचं आत्मबल उंचावतंय? राहुल गांधींचा काय आहे लोकसभेचा अजेंडा? महाराष्ट्रात यात्रेचा काय परिणाम?

नाशिक- भारत न्याय यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्र पिंजून काढत, काँग्रेसला नवसंजिवनी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसतायेत. नंदुरबारमधून राज्यात दाखल झालेली राहुल गांधींची भारत न्याय यात्रा धुळे, मालेगावचा टप्पा ओलांडत तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करते आहे. या दौऱ्यात राहुल गांधी आज त्रंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शनही घेणार आहेत. या यात्रेदम्यान आदिवासी, महिला, शेतकरी, तरुण यांचे प्रश्न […]

ताज्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडची मूळ कल्पना नेमकी कुणाची? फडणवीसांनी ठाकरेंची कल्पना असल्याचं नाकारलं, आता आणखी एका नावाची चर्चा

मुंबई – मुंबईत कोस्टल रोड (Coastal road) सुरु झाल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी आता राजकीय पक्षांत चढाओढ सुरु झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ही कल्पना होती आणि ती आता पूर्णत्वास आली असा दावा, ठाकरे शिवसेनेकडून (Shiv Sena UBT) करण्यात येतोय. तर दुसरीकडं ही जुनी कल्पना होती. उद्धव ठाकरेंच्या आधीपासून हा रस्ता व्हावा, यासाठी प्रयत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘कैसे है आप दाजीसाहब!’ गळाभेट करीत राहुल गांधीनी केली विचारपूस! सोनिया गांधींशी साधला मोबाईलवरून संपर्क!

भारत जोडो यात्रेनिमित्ताने खासदार राहुल गांधी हे धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन घेतली.

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रवींद्र वायकर यांचे नाव भारतीय कामगार सेनेच्या बोर्डावरुन मिटवले

X: @therajkaran मुंबई: शिवसेना आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. ज्या सेनेतून मोठे झाले त्याच सेनेला विसरून गट बदलत असल्याची प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहेत. वायकर हे जोगेश्वरी मतदार संघातील असल्याने त्याच मतदारसंघात येणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार […]