ताज्या बातम्या महाराष्ट्र

Pune Lok Sabha: पुण्यात आघाडीकडे सक्षम उमेदवार नाही

वसंत मोरेंच्या मनधरणीमुळे मविआचे पितळ उघड X: @therajkaran मुंबई: पुण्यातील बहुचर्चित नेते वसंत मोरे यांनी गेले अनेक महिने अपेक्षित असलेला राजीनामा देऊन मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाच. मोरेच्या राजीनाम्याची डोळ्यात तेल घालून वाटच बघत असलेल्या काँग्रेस , शिउबाठा आणि शरद पवार गट या तिघांनीही त्यांना आमच्याच पक्षातून पुणे लोकसभा लढावी, असे आमंत्रण दिले आहे. मविआकडे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं, बीडमधून पंकजा मुंडे; नितीन गडकरीचं काय?

मुंबई : भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव देण्यात आलं नव्हतं. अखेर महाराष्ट्राचं गूढ समोर आलं असून यामध्ये पंकजा मुंडे, रक्षा खडसे, नितीन गडकरी अशा अनेक उमेदवारांचा समावेश आहे. नंदूरबार – डॉ. हिना गावितधुळे – डॉ. सुभाष भामरेजळगाव – […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धुळ्यातील भव्य सभेत ‘मोदींच्या गॅरेंटी’ला आव्हान, राहुल गांधींची सभेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

धुळे : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली. दोंडाईचा येथे राहुल गांधींच्या भव्य रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर ते धुळे शहरात आले. येथे महिला मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या भाषांचे मुद्दे

ताज्या बातम्या मुंबई

Mumbai Lok Sabha : भाजप मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट करणार

मुंबई : लोकसभेच्या तोंडावर भाजप नवीन (BJP) धक्का तंत्र अवलंबणार आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) काही जागांवर दावा सोडायला तयार नाही. पण कोण निवडून येऊ शकतो? त्या आधारावर जागा वाटप व्हावे, यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यासाठी भाजपा आपल्या तीन विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची शक्यता आहे. येत्या एक-दोन दिवसात लोकसभा निवडणुकीचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या गळ्याला

मुंबई: राज्यातील शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर लोकसभेची (Lok Sabha elections) ही पहिलीच निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर (NCP Sharad Pawar) शरद पवार यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी ते स्वतः राज्याचे दौरे करत आहेत. त्यांच्याकडून भाजपला (BJP) धक्का देण्याची तयारी सुरु आहे. भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश देणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Baramati Politics: तुम्ही साथ दिली तर मोठे पाऊल उचलेन: सुनेत्रा पवारांचं बारामती लोकसभेवरून विधान

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदार संघात सुप्रिया सुळे (Supriya Sule )आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची भावजय म्हणजेच सुनेत्रा पवार या उभ्या राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. असे असताना मंगळवारी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Nashik Lok Sabha: स्वामी शांतीगिरी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार

मुंबई: बाबाजी भक्त परिवाराचे स्वामी शांतीगिरी महाराज नाशिकची (Nashik Lok Sabha) लोकसभा निवडणूक (Shantigiri Maharaj) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत (Milind Narvekar) महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून (MVA) शांतिगिरी महाराजांना उमेदवारी दिली जाते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Vasant More : वसंत मोरेंना ठाकरेंसह काँग्रेसकडून ऑफर

मुंबई: नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार तसेच ते कुठल्या पक्षासोबत जातील या बद्दल विविध तर्क-वितर्क, अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र त्यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असे असतानाच आता “आमच्या पक्षात या.. “ अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

हरियाणाच्या राजकारणातून भाजपासोबत गेलेल्यांनी बोध घ्यावा, अजित पवारांसोबतच्या आमदारांना रोहित पवारांची साद?

मुंबई – लोकसभा जागावाटपात सहमती न झाल्यानं हरियाणात सत्तेत असलेलं भाजपा- जेजेपी सरकार कोसळलंय. भाजपानं मंगळवारी युती तोडून अपक्षांच्या मदतीनं नवं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. भाजपासोबत सत्तेत गेलेल्यांनी यातून बोध घ्यावा असं ट्विट शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. काय म्हणालेत रोहित पवार? हरियाणामध्ये दोन जागांचा आग्रह […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआच्या जागावाटपाचा तिढा कायम, प्रकाश आंबेडकरांचं थेट खर्गेंना पत्र, राऊत विरुद्ध वंचित सामना, आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

मुंबई – महाविकास आघाडीतल्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये. वंचितसोबत मुंबईत वरळीत फोर सिझनमध्ये झालेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघेल, अशी आशा होती. मात्र त्या बैठकीत फारसं काही घडलेलं नाही. अशात ९ मार्तला पुढची बैठक होणार असं सांगण्यात आलं होतं, मात्र पुढची बैठकच अद्यापपर्यंत झालेली नाही. अशात प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना […]