MNS : यंदा एकही लोकसभेची जागा मिळणार नाही, मग अमित शाह-राज ठाकरेंमध्ये कशावर झाली डील?
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे एनडीएसोबत निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र भाजपकडून राज ठाकरेंना लोकसभेसाठी एकही जागा दिली जाणार नसल्याचं समोर आलं आहे. […]









