जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

जळगावात भाजपा उमेदवार बदलणार? उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानं कुणाला मिळणार संधी?

मुंबई- जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपात पुन्हा उमेदवार बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारुन स्मिता वाघ यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यामुळं नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी करण पाटील यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघातून करण पाटील यांना उमेदवारी दिलीय. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विशाल पाटलांना धक्का ; महेश खराडेंना उमेदवारी जाहीर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha constituency) ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil )यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांना या मतदारसंघात धक्का बसला होता . आता पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून त्यांना फटका बसला आहे . कारण या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा भाजपला धक्का ; माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha constituency) राजकीय घडामोडीना वेग आला आहे . या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. माढ्याचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil )यांनी भाजपाच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून लवकरच ते राष्ट्रवादीत दाखल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे करणार पवारांचा प्रचार; सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकावरुन चर्चेला उधाण

बारामती : राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते महायुतीचा प्रचार करणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकावर आणि बॅनरवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो दिसल्याने अनेक पश्न उपस्थित केले जात आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर , मुंबईतील तीन जागांचा समावेश

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे .महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aaghadi) लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे.. विशेष म्हणजे या यादीत मुंबईच्या ( mumbai )तीन जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा, पाचवी यादी जाहीर

वंचितची पाचवी यादी समोर आली आहे. या पाचव्या यादीत दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत वंचितकडून चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आज पाचवी यादी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांना वंचितने पुण्यातून उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान आज वंचितची पाचवी यादी समोर आली आहे. रायगड – कुमुदिनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगले मतदारसंघात नवा ट्विस्ट ; शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील लोकसभा निवडणूक लढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट आला आहे . शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टीकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे .. यावेळी त्यांनी स्वत: हातकणंगलेची जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती घराण्याचा अपमान जनता सहन करणार नाही ,याला कोल्हापूरची जनताच उत्तर देईल ; सतेज पाटलांचा हल्लाबोल

मुंबई ; लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे . कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती(Shrimant Shahu Chhatrapati) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे . आताचे महाराज हे कोल्हापूरचे महाराज आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आले आहेत असे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या नावांवर कोट्यावधी रुपये हडप करणाऱ्यांना सोडणार नाही ; रविकांत तुपकरांचा हल्लाबोल

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या नावावर झालेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar )यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे . ते म्हणाले , बुलढाणा जिल्ह्यातून (Buldhana District) समृद्धी महामार्गाच (Samruddhi Mahamarg) बांधकाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. याच शेतकऱ्यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरात वातावरण तापलं ; शाहू महाराज कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत ; संजय मंडलिकांचं वादग्रस्त विधान

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे . या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज (Shahu maharaj )रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) मैदानात उतरले आहेत . या निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात […]