महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : श्रीनिवास काकांनी जी भूमिका मांडली, ती अख्ख्या महाराष्ट्राची : रोहित पवार

X: @therajkaran राष्ट्रवादीत बंड करून भाजपची हातमिळवणी केलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) भूमिकेला त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shreeniwas Pawar) यांनी विरोध दर्शवला. त्यांच्या या भूमिकेला कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पाठिंबा देत अजित पवारांना खडे बोल सुनावले आहेत. जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली, तीच भूमिका अख्या महाराष्ट्राची आहे. सामान्य लोकांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“…..तर ते महाराष्ट्रद्रोही म्हणून ओळखले जातील” : संजय राऊतांचे टिकास्त्र

X: @therajkaran भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी व शहा यांच्या पक्षाला कोणी मदत करणार असतील तर अशा लोकांची ओळख महाराष्ट्रद्रोही अशी राहील,’ असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मला या म्हटले.. म्हणून मी आलो” : बैठकीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

X: @therajkaran महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा (Amit Shah) यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मनसे लवकरच भाजपसोबत युती करुन महायुतीचा भाग होईल, अशी शक्यता आहे. यासाठीच भाजप नेत्यांनी राज यांना दिल्ली दरबारी बोलावले होते, अशी माहिती आहे. राज ठाकरेंनी या भेटीवर “मला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विचार करा, महाराष्ट्र धर्म जपा! – राज ठाकरेंना रोहित पवारांचं आवाहन

X: @therajkaran मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ते भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली भूमिका मांडत महाराष्ट्र धर्मासाठी, सामान्यांसाठी महाशक्तीच्या विरोधात लढणारे नेते आज लोकांना हवे आहेत. राज ठाकरे यांनी अशीच भूमिका घ्यायला हवी. त्यांनी विचार करावा आणि महाराष्ट्रधर्म […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

ठाकरे, शरद पवारांनी असमान वागणूक दिली, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, केवळ काँग्रेसला इतक्या जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव

मुंबई- महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, यावर अखेरीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेजकर यांनी भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी असमान वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्तावही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अल्टिमेटम, संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..

मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले, मात्र त्यांनी या सभेत भाजपावर हल्लाबोल करतानाच काँग्रेसलाही उपदेशाचे डोस पाजले. या सभेनंतर दिवस उलटला तरी अद्याप वंचित मविआसोबत आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीनं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, या सहा जागांवर अडलं जागावाटप, आंबेडकरांच्या निर्णयाकडंही लक्ष

मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याला तीन दिवस उलटले, इंडिया आघाडीची पहिली प्रचाराची सभाही मुंबईत पार पडली, त्यालाही दोन दिवस उलटले. तरीही मविआतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महाविकासा आघाडीच्या जागावाटपाचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मविआतच सहा जागांवर तिढा असल्याचं दिसतंय. त्यात वंचित आघाडीत येणार आणि त्यांना किती जागा मिळणार, यावरुन […]

महाराष्ट्र विश्लेषण

Eknath Shinde : इंडिया आघाडीची सभा ही तडीपार नेत्यांची : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

X : @NalavadeAnant मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेली इंडिया आघाडीची कालची सभा म्हणजे ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे, सत्तेतून हद्दपार केलेल्या तडीपार नेत्यांची सभा होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे गट आणि त्यांच्या इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांवर घणाणाती टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Baramati Lok Sabha : बारामतीच्या जागेवरून अजितदादा मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करतायत : शिवतारेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ 

X: @therajkaran एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवार गटाला (Ajit Pawar) देण्यात येणार आहे. त्यात आता शिंदे गटात असलेल्या विजय शिवतारेंनीच अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. मात्र विजय शिवतारेंच्या निर्णयामुळे बारामतीत (Baramati) अजित पवारांना मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.  आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solapur Lok Sabha : प्रणिती शिंदेंना टक्कर देण्यासाठी भाजपची नवी खेळी : राम सातपुते उतरणार रिंगणात 

X: @therajkaran सोलापूर लोकसभेत (Solapur Lok Sabha) महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. अशातच आता त्यांच्या विरोधात भाजपकडून राम सातपुते (Ram Satpute) यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राम सातपुते यांना तयारीला लागण्याच्या भाजपकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात काटे की टक्कर होणार आहे.  सोलापूरमध्ये […]