ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात उदयनराजेंविरोधात शरद पवारांचा हुकमी एक्का रिंगणात ?

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना साताऱ्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महायुतीतून सातारा मतदारसंघासाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार( Sharad Pawar) हे पृथ्वीराज चव्हाणांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विश्लेषण

राजघराण्यांवरुन शरद पवार आणि भाजपात संघर्ष ? शाहू छत्रपतींनंतर आता मोहिते पाटील घराणंही भाजपापासून दूर?

मुंबई- भाजपानं २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर प्रकर्षानं राज्यातील राजघराण्यांना पक्षाशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता शरद पवार तोडण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. २०१४ विधानसभा निवडणुकांनंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर २०१९ च्या विधानसभेपर्यंत राज्यातील राजघराणी जोडण्याचा प्रयत्न केला होता. आता हीच राजघराणी पुन्हा भाजपापासून तोडण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींच्या उमेदवारीसाठी शरद पवारांनी धरलेला आग्रह आणि त्यानंतर आता रणजीतसिंह […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्यातून उदयनराजे, नाशिकमधून भुजबळ?, महायुतीत कोणत्या मतदारसंघांत बदल?

मुंबई- सातारा आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत सुरु असलेला तिढा सुटल्याचं सांगण्यात येतंय. साताऱ्यात भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेले काही दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. अखेरीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासी झालेल्या चर्चेनंतर या विषयावर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येतंय. सातारा लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांच्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवतारेंचा पवार विरोध मावळला? शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी वर्षावर काढली शिवतारेंची समजूत, आता भूमिका स्पष्ट करणार

मुंबई – बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटत मैदानात उतरलेल्या शिंदे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा राग मावळला असण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिवतारे यांच्याशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केली. यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. या बैठकीत शिवतारे यांच्या आक्षेपावर चर्चा करुन त्यांची समजूत काढली असल्याचं सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरे गटाकडून 17 तर वंचितकडून 8 उमेदवारांची घोषणा; मविआ कसा ठरवणार जागावाटपाचा फॉर्म्युला?

मुंबई : महायुतीविरोधात कंबर कसलेल्या महाविकास आघाडीची पकड हळूहळू सैल होत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी १७ उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचे महाविकास आघाडीसोबत ६ जागांवर चर्चा सुरू असताना त्यांनी थेट ८ उमेदवारांची घोषणा करीत एकला चलो नाराच दिला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब शरद पवार गटात होणार सामील, भाजपला मोठा धक्का; यंदा माढा लोकसभेची लढत चुरशीची

माढा : शरद पवार गटाकडून भाजपला जबर झटका देण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा धक्का आहे. भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उद्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकारण हा तुमचा पिंड नाही ; अजितदादांचा अमोल कोल्हेना टोला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या आरोप प्रत्यारोपदरम्यान अजितदादांनी पुन्हा एकदा राजकारण हा आपला पिंड नाही ,ते आपले काम नाही, असे सांगणारे आता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सोलापुरात राजकीय खेळी ; शरद पवार गटाचे खासदार मोहिते पाटलांच्या भेटीला

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीनंतरचा सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ असलेल्या माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना भाजपकडून उमदेवारी देण्यात आली आहे . त्यांच्या या उमेदवारीला धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे. त्यांनी माढ्याच्या जागेवर दावा केला होता. आपण दावा केल्यानंतरही भाजपने उमेदवारी न दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले आहेत. या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत जाणार का? जरांगे पाटलांची प्रकाश आंबेडकरांनी का घेतली मध्यरात्री भेट? आजचा दिवस निर्णायक

मुंबई- मविआच्या जागावाटपाचा तिढा सुटत असल्याचं दिसत असतानाच वंचित मविआसोबत जाणार की नाही, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मविआतील तिढा सुटला आणि त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी २६ मार्चचा अल्टिमेटम दिला होता. २६ मार्च म्हणजेच मंगळवारी मविआनं प्रकाश आंबेडकरांना चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सात जागांवर वंचित अडून बसल्याचं सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांसमोर नवं संकट, आता शिवतारेंनंतर मराठा क्रांती मोर्चाही मैदानात

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार या सामन्यात आणखी चुरस पाहायाला मिळणार आहे. यापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. यातच आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनंही या मतदारसंघात उमेदवार दिला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मराठा क्रांती मोर्चाचा काय निर्णय? लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एक उमेदवार देणार असल्याचं […]