ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला शरद पवारच जबाबदार ; दिलीप मोहिते पाटलांची टीका

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी काँग्रेसचा आणि नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या शिरूर (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha constituency) ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असा सामना रंगणार आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई ; राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . अज्ञात व्यक्तींनी एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल ४ वेळा खडसेंना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिलीआहे . याप्रकरणी एकनाथ खडसेंनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून धमकीचे फोन, काय आहे कारण?

जळगाव – भाजपात घरवापसी करण्याच्या तयारीत असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अमेरिकेतून चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणी खडसे यांच्या वतीनं मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची विनंती एकनाथ खडसे यांनी केली आहे. दाऊद आणि छोटा शकील गँगकडून हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अंतिम निर्णय १९ तारखेला होईल ; शरद पवारांच्या भेटीनंतर जानकरांचा माढ्यातील सस्पेंस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने बंडाची तयारी केली आहे. दरम्यान, माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली . या भेटीनंतर त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पहिल्या टप्प्यात राज्यातल्या कोणत्या पाच मतदारसंघांमध्ये मतदान?, कोण आहेत आमनेसामने?

नागपूर- होणार होणार, अशी चर्चा आणि अत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरु असलेला पहिला टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपतोय. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कोणत्या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात भाजपाचा डाव फसणार ; फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तम जानकर थोरल्या पवारांच्या भेटीला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघातील माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी दोन दिवसांपूर्वीच नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच बोललं जात असतानाच आता उत्तम जानकर यांनी राजकारणातले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधकाची मोहिते-पाटलांसोबत हातमिळवणी? पवारांची घेतली भेट; भाजपचं टेन्शन वाढलं!

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघ मविआसाठी सुरक्षित करण्यासाठी धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी फासे टाकले. धैर्यशिल मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ अर्धा जिंकल्याचा विश्वास व्यक्त केला जात असताना आता धैर्यशिल मोहिते पाटील भाजपतील इतर नाराज नेत्यांना शरद पवारांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे माळशिरस तालुक्यातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : निवडणुकीनंतर “यांची”  राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल –  भाजपचे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

X: @therajkaran पालघर: निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेसशी समझोता केला आणि  हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप  भाजपचे उत्तर प्रदेश माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत थोरल्या पवारांची अजितदादांच्या शिलेदाराला गळ; बाळासाहेब तावरेंची घेतली भेट

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा ( Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे . या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) बारामतीत आपली सर्व ताकद पणाला लावत अजित पवारांच्या( Ajit Pawar)खास शिलेदारांनाही गळ घालण्याचा सपाटा लावला आहे .याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी माळेगाव कारखान्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले ; जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी आज भाजपडकून निश्चित करण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे . सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाल्याचे सांगत ते […]