ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामती मतदारसंघात अजित पवारांची खेळी ; सुप्रिया सुळेंविरुद्ध रिंगणात उतरणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघामध्ये शरद पवार गटांकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (supriya sule )यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (sunetra pawar )यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नणंद-भावजय लढाईत कुणाला कौल मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा युटर्न ; मी तस बोललोच नाही .. ‘मूळ पवार आणि बाहेरचे पवार’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीत लोकसभा (Baramati Loksabha )मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या आमनेसामने आहेत. त्यावरून सुरु झालेल्या वादानं आता वेगळ वळण घेतलं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरचे पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

विजयसिंहांसह धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, उद्या माढ्यातून भरणार उमेदवारी अर्ज

अकलूज- भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयंत पाटील आणि हजारो समर्थकांच्या उपस्थइतीत अकलूजमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचाही पक्षात प्रवेश केल्याचं जाहीर केलंय. या प्रवेशामुळं माढ्यातील रणजीतसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ही लढत निश्चित झालीय. सोलापूर आणि माढा मतदारसंघात मोठी राजकीय ताकद असलेलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक नाही; अकलूजमध्ये शरद पवारांची जहरी टीका

अकलूज : विरोधी पक्षाचा एकही माणूस निवडून येऊ देऊ नका, याचा अर्थ रशियाचे पुतीन आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्यात काही फरक उरलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर जहरी टीका केली. याशिवाय शरद पवारांनी भाजपच्या 400 पार या घोषणेची खिल्ली उडवली. भाजपने 400 पारऐवजी 543 पार असा नारा दिला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले. मोदी […]

महाराष्ट्र जिल्हे ताज्या बातम्या मुंबई

अजित पवारांनी बहिणीला दिलेल्या शब्दाचं काय झालं, रोहित पवारांचा खोचक सवाल

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष आहे. य़ासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूंकडून प्रचार जोरदार सुरु आहे. पवार विरुद्ध पवार अशी ही लढाई असल्यानं कौटुंबीक मद्देही प्रचारात येताना दजितायेत. शदर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवार यांना खोचक सवाल विचारलेला आहे. अजित पवार म्हणजेच भावानं शब्द दिला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते 14 वर्षांनंतर एकत्र, आज अकलूजमध्ये ‘डिनर डिप्लोमसी’

अकलूज : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पावर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे तिन्ही नेते अकलूज येथे एकत्र येणार असून यावेळी माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघाची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. तब्बल १४ वर्षांनंतर पवार, शिंदे, मोहिते एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी शरद पवार, सुशीलकुमार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

लेकीच्या स्वार्थासाठी पवारांनी पातळी सोडली, दात विचकून हसणाऱ्या डॉ कोल्हेचा बुरखापण फाटला

X: @ajaaysaroj लेकीच्या स्वार्थासाठी पातळी सोडून बोलणारा बाप संपुर्ण महाराष्ट्राने काल बघितला. गेली पाच दशके महाराष्ट्रातील जनतेला पुरोगामीत्वाचे डोस पाजणाऱ्या शरद पवार यांचा दांभिक बेगडी चेहरा देशासमोर उघडा पडला. तर पवारांच्या मांडीला मांडी लावून दात विचकून हसणाऱ्या डॉ अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा मुखवटा किती बेगडी आहे, त्यांच्या मनात स्त्रीबद्दल काय भावना आहेत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

रावेरमध्ये शरद पवार गटात बंड ; श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे शेकडो पदाधिकाऱ्यांचे एकापाठोपाठ राजीनामे!

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीत चांगलाच वेग आला . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मतदारसंघातून दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील (shreeRam Patil) यांना उमेदवारी दिली आहे . त्यामुळे त्यांच्या या निर्णयाविरोधात शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी ; माढ्यात तीन बडे नेते ‘शिवरत्नवर’ एकत्र येणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माढा लोकसभा (Madha Lok Sabha )मतदारसंघात भाजपविरोधात (BJP) नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत . या मतदारसंघात भाजपवर नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांना (dhairyasheel mohite patil) आता माढ्यात शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं निश्चित मानलं जात आहे . याच पार्श्वभूमीवर उद्या अकलूजच्या शिवरत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे (bjp )ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक वक्तव्य केलं आहे . त्यांच्या […]