महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत – मुख्य सचिव सुजाता सौनिक

ठाणे : जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प वेळेत आणि गतीने पूर्ण व्हावेत, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करावे, असे निर्देश मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, नवी मुंबई महानगरपालिका […]

मुंबई ताज्या बातम्या

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

ठाणे : ठाणे जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामार्फत दि. 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) यांना निर्यात संबंधित योजना व उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच निर्यात तज्ज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करणे हे […]

महाराष्ट्र

उद्धव सेनेला कोंडीत पकडण्यासाठी दसऱ्या आधीच निवडणूक आचारसंहिता?

X: @vivekbhavsar मुंबई: दादरचे शिवाजी पार्क मैदान (Dadar Shivaji Park) आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे घट्ट असलेलं समीकरण शिवसैनिकांमध्ये वर्षानुवर्षे चैतन्य फुलवणारे ठरले आहे. याच शिवाजी पार्कच्या मैदानातून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी केलेल्या गर्जनेमुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) तोंडावर होणारा हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि […]

महाराष्ट्र

देशाचे पॉवर हाऊस होण्याची ताकद महाराष्ट्रात : एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

@NalawadeAnant मुंबई: महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस (Power House) होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन असून आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत” “ठाणे विकास परिषद-२०२४” चे आयोजन करण्यात आले […]

विश्लेषण महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपने तयार केली ७५०० कार्यकर्त्यांची फौज

X : @milindmane70 महाड – केंद्रात भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार (NDA government) आल्यानंतर व महाराष्ट्रात भाजपचा (Maharashtra BJP) दारुण पराभव झाल्यानंतर राज्य भाजपाने कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Konkan and Mumbai graduate constituencies) लक्ष केंद्रित केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजय संपादित करण्यासाठी भाजपाने पाच जिल्हे व 48 तालुक्यातून 7 हजार पाचशे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्यातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के, जुन्या शिवसैनिकाला मिळाली संधी

X: ajaaysaroj मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात (Thane Lok Sabha Constituency) अखेर महायुतीतर्फे (Maha Yuti) शिवसेनेकडून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे जुन्या शिवसैनिकाला संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाणे मतदारसंघ महायुतीकडून कोण लढवणार , यावर खूप […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणमध्ये समोर कोणीही असो लढणार आणि जिंकणार; वैशाली दरेकर राणे यांचा दावा

X: @ajaaysaroj मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांच्यामुळे अटीतटीच्या लढतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभेत उबाठा गटाने अखेर शिवसेना महिला आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली मनसेकडून याच मतदारसंघात लढताना त्यांनी तब्बल एक लाख मते मिळवली होती. शिवसेनेत झालेल्या महाफुटीनंतर एक – एक जागा उबाठा गट आणि […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ भाजपाला सोडावाच लागणार? शिंदेंच्या शिवसेनेसमोर नवा पेच?

मुंबई- महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी काही जागांवरुन अद्यापही सहमती झाली नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यात प्रामुख्यानं ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळतायेत. तर दुसरीकडं हेमंत गोडसे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळावी, यासाठी गोडसे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा उमेदवार?, ठाण्याचा तिढा सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला?

मुंबई- महायुतीत तीन ते चार जागांवरुन तिढा अद्याप कायम आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुख्यमंत्री एकतनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा समावेश आहे. ठाणे परिसरात ठाणे, कल्याण आणि पालघर या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. त्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, यासाठी भाजपा नेते आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना हा मतदारसंघ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीत रत्नागिरी, ठाणे आणि कल्याणवरून धुसफूस सुरूच

X: @ajaaysaroj मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेला ठाणे लोकसभा ,त्यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करणाऱ्या कोकणातल्या दोन जिल्ह्यांना कवेत घेतलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या तीन जागांवरून महायुती मध्ये अजूनही धुसफूस सुरूच आहे. जुना ठाणे जिल्हा किंवा आत्ताचा ठाणे जिल्हा व नवीन पालघर जिल्हा यामध्ये लोकसभेचे […]