महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसला वाहिलेली श्रद्धांजली म्हणजे उबाठा गटाची यादी

 संजय निरुपम भडकले तर विश्वजित कदम थेट दिल्लीत गेले X: @ajaaysaroj उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाची बहुप्रतिक्षित यादी आज जाहीर झाली. काँग्रेसच्या प्रतिष्ठेच्या जागांवर उबाठा गटाने थेट उमेदवारच जाहीर केल्याने काँग्रेस नेत्यांच्या रागाचा बांध फुटला. ही यादी म्हणजे उबाठा गटाने काँग्रेसला दफन करून वाहिलेली श्रद्धांजली आहे, अशी तिखट टीका ज्येष्ठ नेते माजी खासदार संजय निरुपम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचितचा मविआला रामराम ; मराठा योध्यासोबत नवी आघाडी स्थापन करणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना वंचीत बहुजन आघाडीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi)साथ सोडत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange )यांना सोबत घेऊन ताकदीनं या लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे आता आघाडीला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा – नाना पटोले

X : @nalavadeanant मुंबई: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नसून त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. मात्र आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा असून या जागांवर पक्षाकडे चांगले उमेदवारही आहेत. परंतु, सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, अशा कानपिचक्या देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित मविआसोबत आहे की नाही?, सस्पेन्स कायम? कोल्हापुरात शाहू छत्रपतींना वंचितचा पाठिंबा

मुंबई- महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच, वंचित मविआत आहे की नाही, याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. २६ मार्चपर्यंत मविआच्या प्रस्तावाची वाट पाहणार असून त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून दिलेल्या उमेदवारीला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. शाहू छत्रपतींना निवडून आणण्यासाठी वंचित ताकदीनिशी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA Meeting : शरद पवारांकडे गुरुवारी मविआची बैठक, प्रचार रणनीती आखणार : संजय राऊत

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, मविआतील जागा वाटप झाले असून ते लवकरच जाहीर करण्यात येईल, असे वारंवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सांगण्यात येत आहे. उद्या गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावला? वंचित मविआतून बाहेर…. मात्र काँग्रेसला सात जागांचा प्रस्ताव

X : @NalavadeAnant मुंबई: महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार व ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे जागावाटपात आपल्याला धोका देत आहेत असा ग्रह झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी एक पत्रक काढत ठाकरे, पवार यांनी विश्वास गमावल्याची टिका करत थेट मविआतून बाहेर पडल्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांवर पाठिंबा देण्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडी 41 जागी महाविकास आघाडीविरोधात उमेदवार देणार!    

X: @therajkaran वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवर ते पत्र शेअर केले आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात काँग्रेसला (Congress) सात मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही सांगाल त्या सात जागांवर आम्ही काँग्रेस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

ठाकरे, शरद पवारांनी असमान वागणूक दिली, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, केवळ काँग्रेसला इतक्या जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव

मुंबई- महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, यावर अखेरीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेजकर यांनी भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी असमान वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्तावही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अल्टिमेटम, संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..

मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले, मात्र त्यांनी या सभेत भाजपावर हल्लाबोल करतानाच काँग्रेसलाही उपदेशाचे डोस पाजले. या सभेनंतर दिवस उलटला तरी अद्याप वंचित मविआसोबत आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीनं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, या सहा जागांवर अडलं जागावाटप, आंबेडकरांच्या निर्णयाकडंही लक्ष

मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याला तीन दिवस उलटले, इंडिया आघाडीची पहिली प्रचाराची सभाही मुंबईत पार पडली, त्यालाही दोन दिवस उलटले. तरीही मविआतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महाविकासा आघाडीच्या जागावाटपाचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मविआतच सहा जागांवर तिढा असल्याचं दिसतंय. त्यात वंचित आघाडीत येणार आणि त्यांना किती जागा मिळणार, यावरुन […]