महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील उमेदवारांवरील लाठीमाराचा मुद्दा विधानसभेत गाजला; वडेट्टीवारांचा सरकारवर आक्रमक हल्लाबोल

नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत अकरा महिने पूर्ण केलेल्या उमेदवारांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या युवकांवर बेछुट लाठीमार झाल्याचा मुद्दा आज विधानसभेच्या विशेष बैठकीत तीव्रतेने गाजला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीच्या वेळी हा विषय अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. या मुद्द्यावर अनेक ज्येष्ठ सदस्य उभे राहून शासनाकडून ठोस आणि स्पष्ट उत्तराची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुती सरकारने वर्षभराच्या कामाची श्वेतपत्रिका सादर करावी :  काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई – महायुती सरकारला सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असताना “सरकार पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून स्वतःची पाठ थोपटत आहे, पण जनतेच्या हाती निराशाच आली आहे” अशी टीका करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला एक वर्षाच्या कामगिरीची श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी केली. वडेट्टीवार म्हणाले, “सरकार उपलब्धीची यादी मिरवत असले तरी वास्तव वेगळे आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“निधीचं अमिष दाखवून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत” — विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई  – “राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधारी नातेवाईक—बायको, बहिण, दीर, मामेभाऊ, मुलगा—यांना बिनविरोध जिंकण्यासाठी दबाव टाकत आहेत. काही ठिकाणी गुलाल उधळून विजय साजरा झाला, पण लोकशाही मात्र पायदळी तुडवली गेली,” असा थेट आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्तेच्या बळावर संपूर्ण यंत्रणा वापरली जात आहे. “कुठे पैशाचे प्रलोभन, तर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेंचाच दरारा ; शिंदेच्या शिवसेनेचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे . एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde)शिवसेनेचे सात खासदार उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray )संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेसोबत गेलेल्या त्याच आमदारांचा पत्ता […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrapur Lok Sabha : कुणबी बहुल  चंद्रपुरात सुधीरभाऊ आणि भाजपसाठी दिल्ली बहोत दूर?

X : @vivekbhavsar  मुंबई: कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने त्यांचे राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात दिवंगत माजी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार हे कोमटी या अल्पसंख्यांक समाजाचे आहेत तर धानोरकर या कुणबी समाजाच्या आहेत. याच […]

महाराष्ट्र

भाजपची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल ; विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election ) सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी, भाजपाची (BJP) घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्पात येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘फुकटच्या साड्यांची गॅरेंटी नसते, तर मग देता कशाला?’ सरकारच्या योजनेवरुन विरोधकांनी सुनावलं!

मुंबई : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डावर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. २०२३-२०२४ या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५ रुपये दिले आहे. स्वस्त धान्य […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

X: @NalavadeAnant मुंबई: मुंबई महानगरपालिका (BMC) भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे ७०० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे, अन्यथा जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा उद्योग सरकारच्या आशिर्वादाने सुरूच […]

मुंबई ताज्या बातम्या

चहल, शिंदे यांची बदली करा : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार

X : @AnantNalavade मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही मुंबई महानगर पालिका आयुक्त आय एस चहल, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अश्विनी भिडे आणि पी. वेलारसू यांची बदली न झाल्याने मुंबईतील निवडणुका मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पडणार नाहीत, अशी दाट शंका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांची तातडीने बदली करावी, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसली नाही’, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात

मुंबई : यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असून या अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसत नाही. सरकारनं मांडलेल्या विक्रमी पुरवणी मागण्यांमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि अडीच हजार कोटी रुपये पिक विम्याचे असताना इतर रक्कम ही कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे का, असा सवाल करण्यात आला. पूर्वी ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडायचे आणि आता […]