मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे (Thackeray) गटाकडून 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत ( sanjay raut यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे .काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam)यांनी उघडपणे ठाकरे गटाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.त्यानंतर आता काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांनीही ट्विट करत ठाकरे गटाला इशारा दिला आहे.
त्या ट्विटमध्ये त्यांनी असे लिहले आहे कि , आताच्या घडीला ठाकरे गटाला एवढेच सांगेन की, सांगली लोकसभा आणि मुंबईतल्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत, त्यावर मित्रपक्षांमध्ये एकमत होणे अजून बाकी आहे. त्यामुळे तिथे एकतर्फी उमेदवार जाहीर करायला नको होते. मुंबईचा मुद्दा जिथे आहे, यासंदर्भात आम्ही आमची नाराजी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुढची पावलं उचलण्यात येतील, असा सूचक इशारा गायकवाड यांनी दिला आहे.
लोकसभेसाठी ठाकरे गटाची यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आम्ही खिचडी चोर उमेदवारांचा प्रचार करणार नाही. आम्ही शिवसेना नेत्यांचा निषेध नोंदवतो. त्यांनी अशा उमेदवारांना तिकीट द्यायला नको होतं. जागा वाटपात आमचे जे नेते होते, त्यांचाही मी निषेध करतो. आमच्या नेतृत्वाला आमची कोणतीही चिंता राही नाही. गेल्या पंधरा दिवसात नेतृत्वाने माझ्याशी कोणतीही चर्चा केली नाही. काँग्रेसचं नेतृत्व देशभरात न्यायाची चर्चा करते. पण पक्षातच न्याय मिळत नाही, अशी टीका ठाकरे गटावर केली होती .तसेच माझ्या मतदारसंघात मी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे. माझ्या मतदारसंघावर माझी पकड आहे. असं असताना मतदारसंघ ठाकरे गटाला दिला गेला. आम्ही शिवसेनेला सरेंडर झालो आहोत. काँग्रेसला श्रद्धांजली देण्याचा हा पर्याय आहे, अशी खोचक टीका करतानाच मी एक आठवड्यात निर्णय घेईल. माझ्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. माझ्या पक्षाला मी एक आठवड्याची मुदत देत आहे, असं निरुपम म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार आहे. आता रहिलेल्या जागांवर सस्पेन्स आहे. त्यात उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांच नाव चर्चेत होते. कल्याणमधून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. जळगावमध्ये ललिता पाटील तर पालघरमध्ये भारती कामडीचे नाव घेतले जात आहे. हातकंणगलेमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावे, यावर चर्चा सुरु आहे. त्याआधीच ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यानंतर ठाकरेंनी ही यादी जाहीर केली आहे.