मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे . गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद अजूनही संपलेला नाही . यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sangli Loksabha) तीन दिवस सांगली दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी विश्वजीत कदम आणि काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या विशाल पाटील (Vishal Prakashbapu Patil )यांना टोला लगावला आहे .पाटलांचे पायलट दुसर कोणीतरी … ते जिकडे नेतील तिकडे ते जात आहेत. आता ते विमान गुजरातला उतरू शकते असं ते म्हणाले आहेत .
सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पेटून उठले आहे . सांगलीची जागा काँग्रेसला द्यावी, यासाठी आमदार विश्वजित कदम हट्टाला पेटले आहेत. या जागेसाठी काँग्रेसचे नेते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना द्यावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.आता ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलाच्या प्रचाराचा सांगलीत धडाका लावला आहे . यावर ठाकरे गटांनी काँग्रेसला टोला लगावला आहे . सांगलीची जागा आम्हीच लढविणार , .. आलात तर तुमच्याबरोबर अन्यथा तुमच्या शिवाय, असा इशारा काँग्रेसला (Congress) दिला होता. अशातच आता काँग्रेसचे (Congress) नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशनू एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सांगली काँग्रेसचीच आहे, हा गड लढवायचा आणि जिंकायचाच असे म्हटलं आहे. सांगली ही काँग्रेसचीच असून, ती आपण सोडायची नाही असं त्यांनी म्हटलं आहे .
दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी काल पुण्यामध्ये बोलताना मित्रपक्षाने सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलतांना राऊत म्हणाले , पवारांचे वक्तव्यावर मला काही बोलायचं नसल्याचे म्हणाले. भिवंडीची जागा पण काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केल्याचे ते म्हणाले. मात्र, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकेल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. आता सांगलीच्या जागेवरून सुरु असलेला वाद वाढणार कि संपणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .