ताज्या बातम्या महाराष्ट्र

“यांच्या” बोलण्या, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही! : आशिष शेलार

X : @NalavadeAnant

मुंबई
महाराष्ट्रातील तमाम जनतेला आमचे आवाहन.. सावधान.!! युवराज म्हणजे तळ्या काठी “खोटे ध्यान” लावून बसणाऱ्या ढोंगी “बगळ्यांच्या टोळीचे म्होरके” आहेत. यांच्या बोलण्यात, वागण्यात कशातच “राम” उरलेला नाही, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला आमदार अँड आशिष शेलार यांनी त्याच शब्दात उत्तर देत त्यांनी ही जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे व ते एक्सवर शेअर केले आहे.

या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, तुम्हाला एका युवराजांचे पत्र आज मिळाले असेल, ते वाचून आमच्या मुंबईकरांना तर हसावे की रडावे असे झाले असेल… ज्यांना आपला इतिहास माहिती नाही किंवा सोईस्कर विसरले असतील, किंवा श्रीमान संजय राऊत यांनी सांगितलेलाच इतिहास, भूगोल माहिती आहे अशा युवराजांनी भविष्य, भूतकाळ आणि वर्तमानाबाबत वैचारिक तारे तोडले आहेत. कुमार वयात केलेले हे भाष्य समजून तुम्ही हे सगळे सोडू द्या…नया है वह..!

कागदावरच आरेचे जंगल घोषित करणारे, आपल्या अहंकारासाठी आरेतील मेट्रो कारशेड अडवून ठेवणारे, मुंबईतील कचरा, सांडपाणी याची विल्हेवाट न लावणारे, प्रदुषणकारी प्रकल्पांचा दंड माफ करणारे हेच तथाकथित पर्यावरण प्रेमी आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री युवराज मुंबईला दूषित करण्यास जबाबदार आहेत. आज बघा कसे तत्त्वज्ञान झाडत आहेत.

कटकमिशनसाठी मुंबईतील बिल्डरांना 12 हजार कोटींचा प्रिमियम माफ यांनी केला, मुंबईत एकाच वेळी बांधकामे सुरु झाली आणि धुळीने मुंबईकरांचा आजही श्वास गुदमरतोय त्याला हेच युवराज जबाबदार आहेत .. आणि हेच आज प्रदुषणाच्या नावाने उलट्या बोंबा मारीत आहेत.

हे आज महाराष्ट्राच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांविषयी बोलत आहेत.. तुम्हाला आठवत असेलच.. बांधावर जाऊन मदत करणार… कर्जमाफी देणार अशा घोषणा दिल्या आणि अडीच वर्षे घरात बसून राहिले. यांच्या अपयशाची यादी किती मोठी आहे, अडीच वर्षात मराठा, ओबीसी आरक्षण घालवले, महाराष्ट्राचे प्रकल्प रोखले…

महाराष्ट्रात प्रकल्प आला की विरोध करणारे, कटकमिशनच्या नादात मुंबई महापालिका लुटणारे… मराठी माणसाच्या घरांमध्ये ही कमिशन खाणारे… कोविडमध्ये मयताच्या बाँडी बँगमध्ये कमिशन खाणारे, रुग्णांच्या औषध, कामगारांच्या खिचडीत कटकमिशन कमावणारे..

अडीच वर्षांत मंत्रालयातही न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आज मगरीचे अश्रू ढाळत आहेत. आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला यांनी मागे नेऊन दाखवले.

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील सरकार आज महाराष्ट्राला पन्हा वेगाने पुढे घेऊन जाण्याचे काम करते आहे. मेट्रो, कोस्टल रोड, शिवडी न्हावा शेवा, नवी मुंबई विमानतळासह राज्यात अनेक विकास कामे सुरु झाली आहेत. पारदर्शक कारभार असलेले सरकार आले, विकास कामे सुरू झाली, राज्यात प्रकल्प येऊ लागले, परदेशी गुंतवणूक होऊ लागली पुन्हा महाराष्ट्र वेगवान झाला असताना या कामांमध्ये “गतिरोधक” म्हणून उबाठा काम करीत आहे अशा शब्दात हल्लाबोल केला आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात