विश्लेषण ताज्या बातम्या

‘टायगर अभी जिंदा है!’ 10 पैकी ८ जागा ‘म्हाताऱ्या’ने जिंकून आणल्या

X : @vivekbhavsar

मुंबई

त्याच्याच पक्षातील नेते त्याला खाजगीत म्हातारा म्हणतात, तो 83 वर्षाचा तरुण आहे. त्याचा पक्ष फोडला, इतके वर्षे एक कुटुंब असलेले त्याचे घर फोडले, कुटुंबात फुट पाडली, पक्ष फोडला, ज्यांना राजकारणात आणले, महत्वाचे पद देऊन राजकीय आणि अर्थी दृष्ट्या सक्षम केले, असे चाळीसहून अधिक आमदार आणि खासदार सोडून गेले, पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह पळवले, त्याच्या कन्येला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले, पण तो हरला नाही, नव्या दामच्या तरूणांना सोबत घेऊन तो मैदानात उतरला आणि जिंकून दाखवले. वय झाले तरी वाघ, सिंह गवत खात नाही, टायगर अभी जिंदा है हे त्याने बंडखोरी केलेल्या कुटुंबातील ‘त्याला’ आणि राज्याच्या राजकारणात एकच बाप आहे आणि तो मीच हे विरोधी पक्षातील एक सर्वंशक्तिमान नेत्याला दाखवून दिले.

या म्हाताऱ्याचे नाव आहे शरद पवार (Sharad Pawar). राष्ट्रवादी पक्षात त्यांचा द्वेष करणारे आणि प्रेम करणारे असे दोघेही त्यांना खाजगीत म्हातारा म्हणतात. म्हातारा हारणारा नाही, आणि थकणाराही नाही, म्हाताऱ्याच्या मागे उभे राहण्याची वेळ आली आहे, असे वाक्य होते सोलापूर (Solapur) ग्रामीण भागातील तरुणांचे. हा कालावधी होता अजित पवार यांनी बंड करून शिवसेना – भाजपची (Shiv Sena – BJP) कास धरली आणि सत्तेत गेले तेव्हाची.

यथावकाश निवडणूक (Lok Sabha election) लागली आणि शरद पवारांनी शिवसेना, कॉंग्रेस आणि त्यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार निवडीकडे जातीने लक्ष घातले. कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांना (Shahu Maharaj) कॉँग्रेसचे तिकीट देण्याचा निर्णय त्यांचाच. मोजक्या 10 जागांवर लक्ष केंद्रित करून शरद पवार यांनी एकेक उमेदवार दिले. त्याचा फायदा पवारांच्या पक्षाला झालेला दिसून आला आहे. 10 पैकी 8 उमेदवार निवडून आले आहेत. भाजपच्या भाषेत बोलायचे झाले तर पवारांचा स्ट्राइक रेट 80 टक्के राहील.

पवारांच्या तुलनेत भाजपचा निकाल अत्यंत लाजिरवाणा लागला आहे. 28 जागा लढून भाजप केवळ 9 जागेवर विजय मिळवू शकला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या पक्षातील काही नेते म्हणतात की फडणवीस हेच राज्याच्या राजकारणातील बाप असून त्यांनी पवारांवरही मात केली आहे. मात्र, आजच्या निकालाने राजकारणातील बाप शरद पवारच आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे.

शरद पवारांच्या पक्षाचे निवडून आलेले उमेदवार असे, – 1. बारामती – सुप्रिया सुले, 2. शिरूर – डॉ अमोल कोल्हे, 3. अहमदनगर – नीलेश लंके, 4. भिवंडी – सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, 5. वर्धा – अमर काळे, 6. माढा – धैर्यशील मोहिते पाटील आणि 7. दिंडोरी – भास्कर भगरे८. बजरंग सोनवणे.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी