मुंबई ताज्या बातम्या

शाखांना भेटी द्यायला उद्धव ठाकरेंना खूप उशीर झाला

उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा शाखा भेटीवर शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांचा घणाघात

Twitter : @NalavadeAnant

सोलापूर

मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात उपस्थिती दर्शवली हा विश्वविक्रम उद्धव ठाकरे यांनी केला. सत्तेवर असताना त्यांना शिवसेना शाखा व कार्यकर्ता दिसला नाही. आज मुंब्रा शाखेला भेट द्यायला निघालेत, मात्र आज उशीर झाला आहे. वेळीच हे काम केलं असतं तर आज “घर का ना घाट का” अशी स्थिती झाली नसती, असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे (Prof Jyoti Waghmare) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

ठाणे येथील शिवसेनेच्या मुंब्रा शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray visited Mumbra) आज गेले होते. त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन प्रा. ज्योती वाघमारे यांनी आपली भूमिका मांडली. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात दिवाळीचा सण (Diwali festival) उत्साहात साजरा केला जात आहे, अशा परिस्थितीत राजकीय चिखलफेकीचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण केले गेले हे अत्यंत दुर्दैवी आहे. 

यावेळी बोलताना वाघमारे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विविध प्रश्न विचारले. हिंदू धर्माचे सण उत्सव आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांना ही नाटकं कशी काय सुचतात ? हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांच्या विचार आणि तत्वांना बुलडोझर लावून उद्धव ठाकरे यांनी सत्ता मिळवली. कदाचित हे निसर्गालाही पटलेले नसावे. त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्यानंतर कोरोनासारखे जागतिक संकट (corona pandemic) आले. अनेक सण उत्सवावर निर्बंध लागले  होते आणि आता निर्बंधमुक्त सण उत्सव साजरे होत आहेत. आज दिवाळीसारखा अत्यंत मोठा सण उत्साहात आणि आनंदात साजरा होत असताना दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होऊ नये, असे उद्धव ठाकरे यांना वाटते का ? राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता चार पैसे गाठीला बांधून सणादिवशी कपडे घेतात किंवा गरिबांच्या झोपडीतही पणती लावून आनंद साजरा करतात. अशा दिवाळीच्या सणात प्रकाशाच्या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम उबाठा गटाकडून होत असल्याचा आरोप प्रा. वाघमारे यांनी केला. प्रत्येक वेळी हिंदूंच्या उत्सवाला गालबोट लावण्याचे काम ते का करतात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांच्या मुंब्रा शाखेला दिलेल्या भेटीबाबत प्रा. वाघमारे पुढे म्हणाल्या,  मुंब्रा शाखा ही धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांनी बांधली होती. त्या शाखेचे प्रमुख असलेले उद्धवराव जगताप यांचे वय 94 वर्षापेक्षा अधिक आहे. ते स्वतः आज शिंदे गटासोबत आहेत. ही शाखा शिवसेनेच्या आत्मा आहे. हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, शाखेमध्ये सेनेची आन-बान – शान आहे. त्या मुंब्रा शाखेत अनेक वर्ष समाजकारण आणि सेवा घडायची. मात्र आज तिथे उबाठा गटाचे काही लोक बिल्डिंग मटेरियलचा धंदा थाटून बसले होते. शाखा भाड्याने दिली होती. शाखा भाड्याने देणे हे आईचं दूध विकून खाण्याचा प्रकार आहे. तुम्ही तुमचा पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना भाड्याने दिला. मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टरला भाड्याने दिली. तुमचं सरकार काँग्रेसला (Congress) भाड्याने दिले आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी भाड्याने देऊन जगण्याचे राजकारण तुम्ही करत आहात, असा घणाघाती आरोप करत ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे, असेही त्या म्हणाल्या.

दुसऱ्या बाजूला आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), खा. संजय राऊत (Sanjay Raut) हे यापूर्वी जातीय दंगली घडविण्याची भाषा करीत होते. दरम्यान, ठाण्यात ड्रग्जप्रकरणी येथील कोविड झालेल्या एका नेत्याच्या तपासणीत ड्रग आढळून आले. या संदर्भात लवकरच भूमिका स्पष्ट होणार आहे, असेही प्रा. वाघमारे यांनी स्पष्ट केले.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक समता धोक्यात आणून महाराष्ट्रात राजकारणाची पोळी भाजणार आहात का..? असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला.

पिंजरा व पोपट घेऊन खा. राऊतांनी भविष्य सांगावे

31 डिसेंबरनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार का..?  यावर खासदार राऊत यांनी भाष्य केले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात प्रा. वाघमारे म्हणाल्या की, खासदार संजय राऊत यांनी आता पिंजरा आणि पोपट घेऊन सगळ्यांचे भविष्य सांगत बसावे. तेवढेच काम आता त्यांना उरले आहे. वास्तविक पाहता त्यांनी स्वतःच्या भविष्याची चिंता करायला हवी, असे मत वाघमारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज