ताज्या बातम्या महाराष्ट्र

वंचित आणि मविआमध्ये फिस्कटलं, मात्र या तीन जागांवर बिनशर्त पाठिंबा

मुंबई : गेल्या महिनाभरापासून वंचित मविआसोबत वाटाघाटी करीत होते. २४ मतदारसंघावरुन ते शेवटी वाटाघाटीत ८ जागांपर्यंत खाली उतरले होते. या दरम्यान उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून वंचितला मविआमध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. उद्धव ठाकरेंनी तर यापूर्वीच वंचितसोबत युती केली होती.

मात्र वंचित आणि काँग्रेसमध्ये वारंवार खटके उडत होते. अशाही परिस्थितीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं. यात काँग्रेसने त्यांच्या पसंतीच्या सात जागा आम्हाला सांगाव्यात, येथे वंचित त्यांना पाठिंबा देईल अशी ऑफर दिली होती. यावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र शेवटपर्यंत त्यांचं मविआसोबत न पटल्याने प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचं ठरवलं.

वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मविआसोबत दूरी असतानाही तीन जागांवर वंचितकडून बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.

कोल्हापूरातून काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधीत महायुतीने अद्याप उमेदवाराचं नाव जाहीर केलं नसलं तरी महायुतीकडून संजय मंडलिक शिवसेनेच्या तिकीटावर रिंगणात उतरू शकतात. शाहू महाराज या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे एक वेगळंच वळण लागलं आहे. शाहू महाराजांवर टीका करणं महायुतीला परवडणारं नाही. त्यामुळे मान गादीला, मत मोदींना अशा प्रकारचं कॅम्पेन महायुतीकडून राबवलं जात आहे. दरम्यान वंचितकडून येथे मविआला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे.

नागपूरमध्ये भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि तिसऱ्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे नितिन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नितिन गडकरींसारखं नाव असल्याने मविआसाठी ही जागा सोपी असणार नाही. येथे मतविभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मविआला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

आज पाच उमेदवारांची यादी जाहीर करताना प्रकाश आंबेडकरांनी बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार आहेत. वहिनी विरूद्ध नणंदेमधील या लढतील वंचितने शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे.

अमरावतीतून वंचितनं कोणत्याही प्रचलित चेहऱ्याला तिकीट न देता प्राजक्ता पिल्लेवान सारख्या अनोखळी आणि प्रकाश झोतात नसलेल्या चेहऱ्याला उमेदवारी दिली गेली असल्याची चर्चा आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीनं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्राजक्ता पिल्लेवान यांना माघार घ्यावी लागू शकते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात