ताज्या बातम्या महाराष्ट्र

विश्वजीत कदमदेखील काँग्रेस सोडणार? Video मधून दिली महत्त्वाची माहिती

सांगली

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसमधून राजीनामा दिला. या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चव्हाणांनी पक्ष सोडण्याचं नेमकं कारण अद्याप जाहीर केलंलं नाही. दरम्यान त्यांच्यासोबत ११ आमदार पक्षाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पंतगराव कदम यांचे सुपूत्र विश्वजीत कदम यांचंही नाव समोर येत आहे.

अशोक चव्हाण येत्या १५ फेब्रुवारीला भाजपत प्रवेश करणार असल्याची शक्यता गडद झाली आहे. त्यांच्यासोबत विश्वजीत कदमदेखील भाजपमध्ये जाऊ शकतात अशा चर्चा सुरू असताना कदमांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले विश्वजीत कदम?
आज सकाळीच राज्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून मला अत्यंत दु:ख झालेलं आहे. यादरम्यान मी देखील आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चुकीच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र मी कोणताही राजीनामा दिलेला नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनात पलूस-कडेगावच्या बांधवांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणतंही पाऊल उचलणार नाही.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात