मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतांना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खटके उडत आहेत . या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi )राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असं म्हणत टीका केली होती . आता त्यांच्या या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिल आहे . मोदींची कौटूंबिक पार्श्वभूमी चिंताजनक आहे ,त्यांना स्वतःच कुटुंब सांभाळता आलं नाही , त्यामुळे मी त्यावर जाऊ इच्छित नाही पण आपण व्यक्तीगत बोलणार नाही असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे .
पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला शरद पवारांचे नातू तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Rajendra Pawar ) यांनीही सडेतोड उत्तर दिल आहे . ते म्हणाले , आदरणीय मोदी साहेब, कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे,” असा टोला लगावत पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी स्वाभिमानाचा आणि पवार साहेबांचा आपण किती धसका घेतला, हे आज कळलं असं त्यांनी ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. .दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. संकटकाळात त्यांना मदत करणार पहिला माणसू मी असेन” असं म्हंटल होत . त्यावर शरद पवार म्हणाले की, “त्यांनी लाख म्हटलं असेल, पण आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये असे ते म्हणाले .
आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सातत्याने महाराष्ट्र दौरे सुरु आहेत, त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे . ते म्हणाले , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीवेळा महाराष्ट्रात येतात? यातून त्यांना आत्मविश्वास नाही हेच दिसत असा टोला शरद पवारांनी लगावला आहे .