मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मनसे दाखल होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नवी दिल्लीत पोहचले आहेत. गेल्या काही काळापासून राज ठाकरे महायुतीसोबत येतील, अशी चर्चा रंगली होती. याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा ते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोहबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन राज ठाकरेंच्या मनसेला महायुतीत सहभागी करुन घेण्यात येईल असं सांगण्यात येतंय.
मनसेच्या वाट्याला काय येणार?
राज ठाकरे लोकसभेच्या तोंडावर महाययुतीत आले तर त्यांना दोन लोकसभा जाहगा सोडणार असल्याचं सांगण्यात येतंय. यात दक्षिण मुंबईतून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर हे निवडणूक लढू शकतात. अशी चर्चा आहे. दोन लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवून पुन्हा पक्षात चैतन्य निर्माण करण्याची संधी राज ठाकरेंपुढे आहे.
विधानसभेत, मुंबई मनपात जास्त जागा?
याचबरोबर महायुतीला या लोकसभेत चांगंल यश मिळालं तर राज ठाकरेंच्या मनसेला विधानसभेत आणि मुंबई महापालिका निवडणुकीतही जास्त् जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीत सहभागी झाल्यानं थेट सत्तेत सहभागी होण्याची संधी राज ठाकरेंना मिळणार आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर २००९ विधानसभा निवडणुकांत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. तर मुंबई महापालिका निवडणुकीतही चांगल्या जागा मिळवल्या होत्या. त्यानंतरच्या निवडणुकांत सातत्यानं मनसेची घसरण झाल्याचं पाहायला मिळालंय. सद्यस्थितीत मनसेचा एकमेक आमदार विधानसभेत आहे. अशा स्थितीत महायुतीत जाऊन पुन्हा सत्तेत सहभागी होण्याची संधी मनसेला मिळणार आहे.
पहिला ठाकरे लोकसभेत जाणार?
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. अमित ठाकरे यांना लोकसभेची जागा मिळाली तर लोकसभेत जाणारे अमित हे पहिले ठाकरे ठरणार आहेत. मनसेच्या आगामी वाटचालीसाठी आणि मुंबईत पुन्हा संघटनात्मक उभारणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीत उद्धव ठाकरेंची स्पेस राज ठाकरेंकडे?
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर, राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली शिवसेनेची स्पेस भरुन काढण्याचाही राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून अमित ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्यानं कोकणासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दौरे करतायेत.
उद्धव ठाकरें काँग्रेसच्या विचारधारेशी समरस होताना दिसत असताना, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे त्यांचं स्थान अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसतायेत.
लोकसभेला जर जागा मिळाल्या नाहीत तर महायुतीत सहभागी होऊन विधानसभेला जास्त जागा पदरात पाडण्याचा प्रयत्नही मनसेकडून केला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःमविआतील जागावाटपाचा तिढा कायम, या सहा जागांवर अडलं जागावाटप, आंबेडकरांच्या निर्णयाकडंही लक्ष