मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे . मात्र या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar ) यांनी माघार घेतल्यानं त्यांच्या जागी शिंदे गटाने रवींद्र वायकर ( Ravindra Dhanegkar ) यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर, अशी लढत उत्तर-पश्चिम मतदारसंघात झाली. या सर्व रणधुमाळीत शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांनी निवडणुकीत आपल्या मुलाला मदत केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे . त्यामुळे आता लोकसभा निकालपूर्वीच कीर्तिकरांची पक्षातून हक्कलपट्टी होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
कीर्तिकर यांच्या लोकसभेच्या माघारीनंतर शिंदे गटातील उपनेते शिशिर शिंदे ( Shishir Shinde ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करणार पत्र लिहल . तसेच सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना बिनविरोध निवडून आणायचा त्यांचा कट होता, असा आरोप दरेकरानीं त्यांच्यावर केला . त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालापूर्वी गजानन कीर्तिकरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तिकरांना पक्षातून निलंबित करतात की त्यांची हकालपट्टी करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर हे एकमेकांविरोधात उभे राहिले होते . मात्र, मतदान संपताच शिंदे गटाच्या गजानन कीर्तिकर यांनी माझा मुलगा अमोल जिंकला तर वडील म्हणून मला आनंद होईल, असे म्हटले होते. या मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे उमेदवार होते. मात्र, निवडणुकीत रवींद्र वायकर हरले काय किंवा जिंकले काय, यामध्ये माझा काय दोष? मी त्यांचा प्रचार करण्याचे काम केले आहे. वायकरांना विजयी करायचे की पराभूत हे मतदारांच्या हातात असल्याचे सांगत गजानन कीर्तिकर यांनी एकप्रकारे हात झटकले होते.
दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले , कीर्तिकरांच्या भूमिकेबद्दल सर्वांना संशय आहे. बोलून जरी दाखवत नसते, तरी कीर्तिकरांनी अशी भूमिका घेऊ नये, या मताचे आम्ही सर्वजण होतो आणि आजही आहोत. मुलाच्या उमेदवारीबद्दल त्यांनी भाष्य करायलाच नको होते असे ते म्हणाले आहेत . आता कीर्तिकरांची हकालपट्टी होणार का याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .