ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित दादांचं ठरलं! 28 मार्चला राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई : मागील काही दिवसांपासून महायुतीमधील पक्षानं जागा (Mahayuti Seat Sharing) वाटपाच्या मुद्यावरून बैठकांवर जोर धरला आहे. यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील (Lok Sabha Elections First Phase) एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही.मात्र तरीही आता 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीत जागावाटपाच्या निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने(Ajit Pawar Group )9 जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपकडून एवढ्या जागा देण्याची शक्यता कमी आहे. काही जागांवर राष्ट्रवादीने दावा केला असून, त्या जागा भाजप आणि शिवसेनेला देखील हव्या आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याची माहिती आहे. अशात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत 5 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अंतिम निर्णयाकडे तीनही पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागून आहे.;येत्या दोन दिवसांत महायुतीमधील जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता असून, त्यानुसार 28 मार्च रोजी अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

महायुतीत शिरूर लोकसभा मतदारसंघ लढवण्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil)निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ., उद्या संध्याकाळी चार वाजता मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. उद्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर ते महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून शिरूर लोकसभेसाठी उभे राहताना पाहायला मिळणार आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात