मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )यांनी आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात विराट शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीसाठी थंड थोपटले आहेत . अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांची दसरा चौकातील मैदानावर भव्य सभा पार पडली. या सभेनंतर शेट्टी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. यावेळी दसरा चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .
ऐतिहासिक दसरा चौकातुन विराट असे शक्तिप्रदर्शन करत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला . यावेळी ते म्हणजे कि ,आज लोकसभेसाठी चौथ्यांदा स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. खोक्याचा बाजार करणारे झुंडी एका बाजूला माझ्या विरोधात उभी आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत माझ्यासोबत आहेत , असे म्हणत त्यांनी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासह राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर तोफ डागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ईडीचा डाव थांबवावा , माझ्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत . मी काय ईडीला घाबरत नाही आता या ईडी कार्यालय विरोधात मोर्चा काढावा अशी परिस्थिती असल्याचे सांगत शेट्टी यांनी हिम्मत असेल तर मला एकदा नोटीस पाठवावी एकदा असे आव्हानही त्यांना केल आहे . तसेच या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून यापुढे विद्यार्थी आणि बेरोजगारांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली. देशांमध्ये बेरोजगारीची टक्केवारी सर्वाधिक आहे. त्यामुळे आर्थिक धोरणे बदला, त्याशिवाय बेरोजगारी हटणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडणुकीत बेरोजगारीवर निवडून आल्यानंतर संसदेत आवाज उठवू असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान या हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह महायुतीचे धैर्यशील माने, वंचितचे डी . सी पाटील, आणि महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरूडकर यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आता चौरंगी लढत रंगणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये काय होणार याचे उत्तर 4 जून रोजीच मिळणार आहे.