मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात खळबळ उडाली आहे . या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)रिंगणात आहेत . दरम्यान शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या महायुतीच्या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी पोहचल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी मतदान केल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांची आई यांना भेटण्यासाठी काटेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. या भेटीचा परिणाम नक्कीच मतदारांवर होईल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे . दरम्यान या भेटीवर त्या म्हणाल्या , मी गेले तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. काकींना ( आशाताई पवार) भेटण्यासाठी आपण गेलो होतो .त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती. असे त्यांनी सांगितले . .
या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवण्यात आली मात्र हे कुटुंब एकच आहे. पवार कुटुंबात कोणतेच वितुष्ट नाही, हे एकत्रच राहणार असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून या लढाईत सहभागी व्हायचे का? असा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये जाण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये मतदान सुरु होऊन अवघे चार तास उलटले आहेत. मतदानाचे आणखी सात तास शिल्लक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .