X: @therajkaran
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी (Vinayak Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी कोरोना काळात खासदारांचा 8000 कोटी रुपयांचा निधी थांबवून स्वतःसाठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी kela आहे.
रत्नागिरी (Ratnagiri) १ सिंधुदुर्ग (Sidhudurg) लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार 101 टक्के पडणार ही गॅरंटी असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे .
निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपला प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात, अशी वेळ त्यांच्यावर आली असल्याची टीका करत राऊत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Savant ) यांच्यावरही निशाणा साधला आहे. सावंतांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला. त्यांच्या पोटावर पाय आणण्याचं काम केले, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
खासदार राऊत यांनी माजी आमदार प्रमोद जठारांच्या (Pramod Jathar) टिकेलाही चोख प्रत्युतर दिल आहे. यावर ‘हो, विनायक राऊत खलनायकच आहे, जठार तुमच्या दलालीला आळा घालण्यासाठी मी खलनायक आहे. आमच्या आघाडीमध्ये कोणीही अब्जोपती नेता नाही. आमच्या केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत बंगला असून त्याचा सर्वसामान्य जनतेला काही उपयोग नाही. मात्र, माझं घर असून ते सर्वसामान्य जनतेला खुलं आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी विनायक राऊतची जेवढी जमीन होती, तेवढीच आहे. माझी जरा जरी जमीन वाढली, तरी राणे कुटुंबीयांना लाभो, असा टोला राणेंना (Rane) लगावला आहे.