ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय ; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपाचे (bjp )ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण (Madhukar Chavan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे धक्कादायक वक्तव्य केलं आहे . त्यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आगामी लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी भाजपाकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पण आता अब की बार 400 पार असा नारा भाजपाकडून देण्यात आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान ते सतेत्त आल्यास भारत जगात शक्तिशाली बनेल या भीतीने त्यांच्या हत्येचा कट रचला जातोय असे वक्तव्य गुहागरमध्ये झालेल्या महायुतीच्या सभेत बोलताना भाजप नेते मधुकर चव्हाण यांनी केलं आहे . दरम्यान ते पुढे म्हणाले , सावध व्हा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कमळ हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे. पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेऊन कामाला लागा. आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवा आहे असे त्यांनी म्हटले आहे .

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे . ते म्हणाले , बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत. पण उद्धव ठाकरे तुम्ही झुकलात. सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकलात,” अशा शब्दात चव्हाणांनी उद्धव ठाकरें यांच्यावर निशाणा साधला आहे . तसेच शरद पवार यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारच आहेत. स्वतःला जाणता राजा म्हणवणाऱ्या शरद पवार यांना राजा कसा असतो हे माहिती आहे का?” असा सवालही मधुकर चव्हाण यांनी केला आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात