ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातकणंगलेत नवा ट्विस्ट ; राष्ट्रवादीचे जयंत पाटील शिंदे समर्थक आमदारांच्या भेटीला

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना हातकणंगले (Hatkanangale) लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे . राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची (Rajendra Patil Yadravkar) भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना त्यांनी या मतदारसंघात मद्दत करावी असं आवाहन देखील केलं आहे . त्यामुळे यड्रावकर आणि जयंत पाटलांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे.

या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. महायुतीने शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांना उमेदवारी दिली आहे .तर मविआकडून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी (Raju Shetti) मैदानात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाच्या आमदाराची भेट घेतली आहे. यामुळे हातकणंगलेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे .

हातकणंगले मतदारसंघात सध्या धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत . मात्र त्यांच्यावरील नाराजीमुळे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव देखील हातकणंगले लोकसभेसाठी चर्चेत होतं. याआधी राजेंद्र पाटील यड्रावकर यांना २०१९ ला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते आमदार म्हणून निवडुन आले. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. .मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मैत्रीचे संबध हे त्याचे आधीपासूनचे आहेत आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी राजेंद्र टोपे यांनी देखील राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली होती. आता त्यानंतर जयसिंगपूरमधील यड्रावकर यांच्या घरी जाऊन जयंत पाटील यांनी भेट घेतली आहे .याभेटीवेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे उपस्थित होते . मात्र निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात