X: @therajkaran
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Deveandra Fadanvis) यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुम्ही शिरूरमधून अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) विरोधात तुम्ही निवडणूक लढवणार का? असा सवाल केला. यावर नाना पाटेकर म्हणाले, मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली. मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नाही. कारण राजकारण हा माझा प्रांत नाही. तिथे गेलो तर आत्ता जे काम करतो आहे, ते काम करण्यात जे समाधान आहे, ते मला मिळणार नाही.
निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, मी जर राजकारणात आलो तर मनात असलेले सगळं आपल्याला बोलू देतील की नाही माहीत नाही. तसंच किती काळ राजकारणात राहू देतील, ते पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही “नाम”च्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आहोत, असे ते म्हणाले.
मला तुम्हीच कळवा की मी कुठून निवडणूक लढवणार आहे? मी खूप ठिकाणांहून निवडणूक लढवणार अशा चर्चा ऐकतो. एकदा मला सांगा की मी कुठून निवडणूक लढवणार”, असेही ते यावेळी मिश्किलपणे म्हणाले.