मुंबई : भाजपने महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना डावलून अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रचंड विरोध केला आहे. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे . या पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे . त्यांनी विकासासाठी अडसूळ आणि बच्चू कडू यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. आजपर्यंत कधीही अमरावतीमध्ये कमळ फुललं नाही. यावेळी कमळ फुललं पाहिजे, असं अमरावतीकरांची इच्छा होती. आमची इच्छा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केली, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत
अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्रासाठी मोदीजी जरुरी आहे. मोदीजींच्या हात मजबूत करण्यासाठी त्यांना हात जोडून विनंती करेल की नवनीत राणाला आशीर्वाद द्या. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या आणि आपल्याला या खऱ्या अर्थाने एक संधी मिळाली आहेत त्या संधीच्या सोनं करूया, असं त्या म्हणालया . आनंदराव अडसूळ साहेब असू द्या, की बच्चू कडू असू द्या आमचे सगळे एनडीएचे घटक आहेत. देशाला आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे. कोणी काय म्हटलं आणि कोणी काही नाही म्हटलं. त्यांना उत्तर देताना फक्त माझे जेवढे ही सीनियर लीडर आहेत. त्यांना फक्त विनंती करू शकते. अमरावतीच्या विकासासाठी सगळ्यांनी सोबत आले पाहिजे. अबकी बार 400 पार आणि अमरावती उसमे से एक रहेगा. त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून (loksabha election )नवनीत राणा या एनडीएचा भाग राहिलेल्या आहेत. त्यांनी संसदेत वेगवेगळी महत्त्वाची विधेयकं मजूर होताना भाजपच्या समर्थनार्थ मत दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणा यांचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेतली होती. राणा दाम्पत्य तसेच फडणवीस यांची या विषयावर अनेक बैठका झाल्या. त्यानंतर आता शेवटी राणा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी मिळणे हा राणा दाम्पत्यासाठीज खूप मोठा विय मानला जात आहे.