मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )बाजी मारून राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा झटका दिला आहे. निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपल्यावर घेत त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याच पार्शवभूमीवर झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा राजीनामा फेटाळून लावला आहे . तूर्तास राजीनामा देऊ नका , राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल. नरेंद्र मोदींच्या शपथविधीनंतर आपण सविस्तर बोलू असं देखील अमित शाह यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली येथे एनडीएच्या सर्व घटक पक्षांची बैठक पार पडली . यानंतर देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेले . या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर पडला आहे . त्यांनी आपले काम सुरु ठेवावे असे निर्देश शहांनी दिले आहेत .नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत (Maharashtra) सविस्तर चर्चा करुन निर्णय करु असं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करु. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने 28 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी 9 जागांवर भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळं भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मला सरकारमधून मोकळं करा, असं म्हणत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती.