अमरावती : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आघाडी करण्याचं चित्र आहे. बच्चू कडू यांनी महायुतीला मोठा झटका देत अमरावती येथून प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार घोषित केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीला वारंवार अल्टिमेटम दिला होता. त्यांनी अखेर अमरावती येथे उमेदवार घोषित करत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. अशा वेळी आज प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी दिनेश बूब या जुन्या शिवसैनिकाला तिकीट दिलं आहे.
तर दुसरीकडे शिवसेना नेते अभिजीत अडसूळ अपक्ष निवडणूक लढवणार ठाम आहेत. ते प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिशेन बूब यांना पाठिंबा दिल्याचं सांगितलं जात आहे. मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होऊ नये यासाठी अडसुळांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
मरावती येथील निवडणूक चांगलीच चुरशीची होईल. इतकेच नाही तर अमरावती येथे वंचित बहुजन आघाडीनेदेखील उमेदवार घोषित केला आहे. वंचितने येथे प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली आहे.त्यामुळे अमरावतीत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.