धुळे : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली. दोंडाईचा येथे राहुल गांधींच्या भव्य रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर ते धुळे शहरात आले. येथे महिला मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांच्या भाषांचे मुद्दे
- आर्थिक अन्याय होत आहे, सामाजिक अन्याय होत आहे.लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातं आहे. घरगुती एलपीजी दर 400 वरून 1100 वर गेले आहेत. लोकांच्या समस्यांवर बोललं जातं नाही. जीएसटी गोळा होतो तो श्रीमंतांच्या कर्जमाफीत जातो.
- या व्यवस्थेत महिलांवर सर्वाधिक अन्याय होत आहे. महिलांना 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली. पण सर्वे केल्यानंतर आरक्षण देणार, म्हणजे हे आरक्षण 10 वर्षानंतर महिलांपर्यंत पोहोचेल. काँग्रेस एका दमात आरक्षण देणार. सर्वेक्षणाची गरज राहणार नाही.
- काँग्रेस सरकारमध्ये आल्यास आर्थिक सक्षम करण्यावर भर देणार. पेपर लीक होत आहेत, यामुळे गरीबांच्या मुलांची मेहनत वाया जातेय. वीज बिल, पाणी बिलही भरमसाठ येत आहे.
- काँग्रेस सत्तेत आली तर महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये थेट 1 लाख देणार. सरकारी कार्यालयात 50 टक्के नोकऱ्या देणार. महिलांवरील आर्थिक अन्याय दूर करणार.
- ग्रामपंचायतीत महिलांना संधी देणार. महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारणार. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वसतिगृह उभारणार. तसेच भारतातील कोटी महिलांच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये टाकले जातील.
- जर नरेंद्र मोदी श्रीमंतांचे करोडो रुपये माफ करू शकतात तर आम्ही कोटी महिलांना एक लाख रुपये देऊ.
- सरकारी जागेवर महिलांना 50 टक्के आरक्षण देऊ आणि प्रत्येक सरकारी कार्यालयात काही वर्षात महिलांना 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात येईल.
- सावित्री फुले यांच्या आठवणीत प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी वसतिगृह उभारू.येथे सुरक्षा, चांगलं भोजन, राहण्याची व्यवस्था मिळेल याची काळजी घेतली जाईल.
- जातगणना केल्यानंतर आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण केले जाणार. देशातील संपत्तीत कोणाकडे किती वाटा याचे सर्वेक्षण केले जाणार. काँग्रेस सरकार आल्यावर जातं निहाय जनगणना, आर्थिक सर्वे आणि सरकारी संस्थानमधील सर्वे केले जातील.
- दलित, आदिवासी, महिला, शेतकरी यांच्या विकासासाठी काहीतरी मार्ग काढावा लागेल. यासाठी जातीनिहाय जनगणना केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती समजेल.