मुंबई : अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागून राहिलेल्या सातारा (Satara Loksabha) लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या दोन दिवसापासून खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र तरीही अद्याप केंद्रीय मंत्री अमित शहा(Amit Shah) यांची भेट न झाल्याने सातारच्या (Satara)राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे.उदयनराजे यांना उमेदवारी मिळणार की नाही? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या उमेदवारीवरूनच ठाकरे गटाने भाजपवर तोफ डागली आहे.आम्ही कोल्हापूरात शाहू महाराजांना जागा दिली मात्र कोणी काहीच बोललं नाही. मात्र, भाजप महाराष्ट्राचा स्वाभिमान खालावत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी केली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान कसा दिल्लीमध्ये केला जात आहे हे दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी बोलताना भाजप आणि शिंदे गट वेगळा नाही, शिंदे गट नावाला असल्याचा टोला लगावला. त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार हे आम्ही बघत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढू असे त्यांनी स्पष्ट केले.तसेच लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar)जागेवरून वाद सुरु आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, संभाजीनगर जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्रअधिकृत यादी समोर आल्यानंतर जागा स्पष्ट होईल आणि ती यादी सामनातून जाहीर होईल. साहेबांनी जिल्हानिहाय नावे जाहीर केले असली तरी सामनामधून अधिकृतरित्या जाहीर होईल. योग्य वेळी सर्व यादी जाहीर होणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आढळराव पाटील हे शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. यावर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी सांगितले की, हे सर्व काही सत्तेसाठी सुरू आहे. बाळासाहेबांचे विचार, विकासकामे काही नसून हे सर्व सत्तेसाठी गेल्याची टीका त्यांनी केली. मनसेच्या महायुतीमधील(MNS) मनसेच्या समावेशावर बोलताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मला वाटत नाही अशा गोष्टी होतील, या आधीच ठरलेल्या असतात. ठाकरे नाव पाहिजे पण ठाकरे नाव आणि मनगट फक्त उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.