ताज्या बातम्या महाराष्ट्र

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘NMFDC’च्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’सह अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

तलाठी परीक्षा पेपर संदर्भातील घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा – नाना पटोले

मुंबई : तलाठी परीक्षेत पेपर संदर्भात झालेला घोटाळा हा मध्यप्रदेशात एकेकाळी झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे असा खळबळजनक आरोप काँग्रेस ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत केला. पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते बोलत होते. तलाठी होऊ इच्छिणाऱ्या युवकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न पटोले यांनी केला. सरकारच घोटाळा करते आणि सरकारच […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘मोंदींच्या परवानगी शिवाय मंदिरात जाता येणार नाही का?’ राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं, काँग्रेसचा संताप

आसाम भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी आसाममध्ये आहेत. यावेळी येथील एका मंदिरात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं. राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आसाममधील नागांव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथे बताद्रवा थान भागात वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांचं जन्मस्थळ आहे. राहुल गांधींना आज शंकरदेव मंदिरात जायचं होतं. मात्र त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं, याशिवाय भाजपच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जागतिक बँकेच्या अहवालानंतर ठाकरे गटाची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

मुंबई जागतिक बँकेच्या एका अहवालावरुन ठाकरे गटाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, १८० रुपयांवर गुजराण करणाऱ्या देशांच्या यादीत दक्षिण आशिया खंडातील सर्वाधिक देशांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भारतातील ७० टक्के नागरिकांचा समावेश आहे. २०२३ च्या बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवालानुसार जगातील सर्वात गरीब लोकांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल ३८९ दशलक्ष लोक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुधाला ५ रु. प्रति लिटर अनुदान, रेशीम उद्योग विकासांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारने जाहीर केला मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या विषयांवर निर्णय सुनावला आहे. याबाबत मंत्रिमंडळाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचं शिंदेंनी घोषित केलं आहे. याशिवाय मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी “सिल्क समग्र २” योजना राबविणार. रेशीम […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : भाजपला पराभव दिसू लागल्याने प्रचारसभांमध्ये अश्लील नृत्यांचा आधार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आरोप, व्हिडीओ व्हायरल मुंबई – “यंदाची मुंबई महानगरपालिका भाजपच जिंकणार” अशा दर्पोक्ती करणाऱ्या भाजप नेत्यांना आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या भक्कम युतीमुळे आपला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच भाजपने मुंबईतील प्रचारसभांमध्ये बिहार व उत्तर प्रदेशातून आणलेल्या गायिकांच्या अश्लील नृत्यांचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आखिल […]

लेख ताज्या बातम्या

ज्यांनी वाजपेयी, अडवाणी, मुंडेंची ठेवली नाही ते विलासरावांची काय आठवण ठेवणार ?

राज्यात मुंबई, ठाणे सह २९ महानगरपालिका निवडणुकांचा मोठ्या प्रमाणावर झंझावाती प्रचार सुरु आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल लागेल. परंतु डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या असो किंवा आताच्या महानगरपालिका निवडणुका असोत, अगदी हल्ली होत असलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा दर्जा अतिशय खालावलेला दिसून येतोय. कोण काय भाषणे करतो आणि या भाषणांमधून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या लेख

मराठीचा अभिमान; मात्र भाषीय राजकारण अमान्य

राज्यातील महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू असली, तरी सध्या सर्वांचे लक्ष मुख्यतः मुंबई महापालिका निवडणुकीकडे केंद्रित झाले आहे. हे लक्ष वेधून घेण्यामागे कारणे स्पष्ट आहेत. सुमारे ७२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, देशाची आर्थिक राजधानी, आशियातील अनेक छोट्या देशांपेक्षा मोठे प्रशासन, आणि राजकीय-सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई — या सगळ्यांमुळे मुंबई महापालिका निवडणूक केवळ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Legal Explainer: बिनविरोध निवडणूक, मतदान आणि NOTA: कायदेशीर वास्तव काय आहे?

मुंबई: सध्या अनेक महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी होत आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे- “मतदानच नसेल, तर मतदारांचा NOTA हक्क कुठे गेला?” या प्रश्नाचे उत्तर भावनिक नव्हे, तर कायदेशीर आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. बिनविरोध निवडणूक म्हणजे नेमके काय? निवडणूक प्रक्रियेत तीन टप्पे असतात: 1️⃣ उमेदवारी अर्ज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS: बिनविरोध निवडींविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांची हायकोर्टात धाव; निवडणूक प्रक्रियेवरच सवाल

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून येत असल्याच्या तसेच अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज बाद होत असल्याच्या घटनांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र हरकत नोंदवली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बिनविरोध […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘स्वातंत्र्यानंतरही आम्ही भटकेच का?’ – उचल्याकार लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनातून आक्रोश

सातारा : छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी विमुक्त-भटक्या समाजाच्या वेदनांना शब्द देत सभागृह अक्षरशः स्तब्ध केले. “बेरड, रामोशी, कैकाडी, मसणजोगी, नंदीबैलवाले यांसह अनेक जाती छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे होतो. रुप पालटून हेरगिरी करणारे खरे ‘सीआयडी’ आम्हीच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Farmers protest: शेतकऱ्यांविरोधी धोरणांविरुद्ध संघर्ष तीव्र करणार; देशव्यापी आंदोलन जाहीर

अखिल भारतीय किसान सभेच्या राष्ट्रीय परिषदेत ठराव नागपूर: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकऱ्यांविरोधी धोरणांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा ठराव अखिल भारतीय किसान सभा (AIKS) च्या राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आला. ही परिषद ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे पार पडली. या परिषदेला AIKS चे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. देशातील २२ राज्यांतील ६५ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“ही तर शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगी” – योगेश वसंत त्रिवेदी

मुंबई : साप्ताहिक ‘आहुति’च्या हीरक महोत्सवी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मिळणे ही शतकमहोत्सवी विधानपरिषदेची देणगीच म्हणावी लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. साप्ताहिक आहुतिचा हा हीरक महोत्सवी समारंभ अंबरनाथ येथील वडवली विभागातील रोटरी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला प्रहारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे आणि ठाणे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Bank strike: २७ जानेवारीला देशव्यापी बँक संप; पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन

मुंबई: पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी २७ जानेवारी रोजी देशव्यापी संपावर जाणार असल्याची घोषणा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात २०० हून अधिक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sahitya Sammelan: ‘आयुष्यात जे घडतं त्याला मीच कारणीभूत असतो’ – अमोल पालेकर

सातारा: छत्रपती शाहू महाराज साहित्य नगरीत सुरू असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी आपल्या जीवनप्रवासावर स्पष्ट आणि आत्मपरीक्षणात्मक भूमिका मांडली. “आयुष्यात जे काही घडतं, त्याला मीच कारणीभूत असतो, असा माझा ठाम विश्वास आहे,” असे सुस्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. पालेकर यांच्या ‘ऐवज – एक स्मृतीबंध’ या आत्मचरित्रपर […]