महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]

मुंबई महाराष्ट्र

धुळे : दुधात भेसळ आढळलेल्या विक्रेत्यांवर कारवाई

Twitter : @therajkaran धुळे धुळे जिल्ह्यात दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या संयुक्तीक पथकाने आज दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळलेल्या दुध विक्रेत्यावर कारवाई केली असल्याची माहिती दूध भेसळ नियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली […]

मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रपती राजवटीची कल्पना शरद पवारांचीच – देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट (President Rule in Maharashtra) लागू करण्याची कल्पना ही शरद पवार यांचीच होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला धोका दिला होता. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्याकडे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आरोग्य मंत्र्याच्या मतदारसंघात ऑक्सिजनअभावी चार-महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Twitter : @therajkaran मुंबई राज्यातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आणण्यात खारीचा नव्हे तर घारीचा वाटा उचलणारे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या धारशिव जिल्ह्यात देखील मुलांचे मृत्यू होत आहेत, असा घणाघाती आरोप माजी आमदार राहुल मोटे यांनी केला ह. यासंदर्भात मोटे म्हणाले की, आधी ठाणे, त्यांनतर नांदेड, संभाजीनगर आणि नागपूर याठिकाणी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मृत्यू […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

ही प्रगतीशील महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारी बाब नाही – रामदास आठवले

Twitter : @NalavadeAnant मुंबई नांदेड आणि औरंगाबादमधील सरकारी रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची अंत्यत दु:खद, वेदनादायक दुर्घटना घडली. औषधांच्या तुटवड्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होणे प्रगतीशील महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारी बाब नाही, अशा परखड शब्दात सरकारला कानपिचक्या देत, या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण

अखेर नाराजी कामी आली; उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याची “सुभेदारी”

Twitter @NalavadeAnant मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छेखातर सतेत सहभागी होऊनही केवळ पुण्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी रुसून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाच दांडी मारली. त्यामुळे हादरलेल्या एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांनी बरीच चर्चा करत अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याची सुभेदारी देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी हा निर्णय […]

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजप ॲक्शन मोडवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही […]

ताज्या बातम्या मुंबई

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील वादग्रस्त नोकर भरतीला स्थगिती

Twitter : @therajkaran कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (Kalyan APMC) प्रशासकीय काळात नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरु आहे. या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ही भरती रद्द करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पणन मंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार!- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Twitter : @therajkaran मुंबई धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची विखे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंच यांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

खासदारांकडून माफीनामा घ्या! हेमंत पाटीलांवर प्रकरण शेकणार 

अधिष्ठात्यांना शौचालय साफ करण्यास लावल्याने डॉक्टर संघटनांचा संताप Twitter : @therajkaran मुंबई : नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे (Dean Dr Shyamrao Wakode) यांना एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना खा. हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी शौचालय साफ करण्यास भाग पाडले. या घटनेचे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटत असून खा. हेमंत पाटील […]