ताज्या बातम्या महाराष्ट्र

कंत्राटी पद्धतीने भरतीला अधिकारी महासंघाचा विरोध

Twitter : मुंबई बाहययंत्रणेद्वारे १३८ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. राज्य सरकारने हा जीआर तातडीने रदद करावा, अशी मागणी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सोमवारी पत्राद्वारे केली आहे. हा जीआर रद्द न केल्यास राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार असून या संदर्भातील शासनाने काढलेल्या जीआरची  शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी प्रदेश कार्यालयासमोर होळी करण्यात आली. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख व प्रदेश उपाध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारीही […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरक्षण मर्यादा वाढविण्याचा काँग्रेस कार्यसमितीचा ठराव – अशोक चव्हाण

Twitter : @NalavadeAnant मुंबई काँग्रेस कार्यसमितीच्या हैद्राबाद येथील दोन दिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळाल्याचा दावा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. ही काँग्रेसची ठाम भूमिका असून आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून संसदेच्या विशेष अधिवेशनात […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

…त्याची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही – अध्यक्ष राहुल नार्वेकर

Twitter : @NalavadeAnant मुंबई आमदारांच्या आपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात निर्णय घेण्यास सांगितले आहे, यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मला आतापर्यंत कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही. मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्या विषयी माहिती घेऊन, योग्य निर्णय घेईन.” आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिरंगाई होते, असे मत सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे. यावर पत्रकारांनी सोमवारी […]

शोध बातमी महाराष्ट्र मुंबई

मंत्री रवींद्र चव्हाणांचा डोक्यावर हात; मंत्रालयातील पॉवरफुल सुपे; ८ वर्षांनी बदली; एका दिवसात स्टे आणला

Twitter : @vivekbhavsar मुंबई मंत्रालयीन केडरमध्ये काम करणारे आणि मंत्र्यांशी “खास” संबंध ठेवून असणारे काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी चिटकून असतात तर अनेक अधिकाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली होत असते. अन्न व नागरी पुरवठा विभागात असाच एक पावरफुल सहसचिव दर्जाचा अधिकारी असून मंत्रालयीन अधिकाऱ्यांमध्ये त्यांना “डॉन” या नावाने ओळखले जाते. मधला दीड वर्षाचा अपवाद […]

महाराष्ट्र जिल्हे

महाड : अवैद्य धंद्यांना राजकीय वरदहस्त कोणाचा ? मनसेचा सवाल

Twitter : @MilindMane70 महाड रायगड जिल्ह्यातील महाड शहर हे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत कोणत्याही बेकायदेशीर व अवैध धंद्यांना मोकळीक दिली जाऊ नये, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार हे धंदे काही काळ बंद ठेवण्यात आले […]

महाराष्ट्र

46 हजार कोटींहून अधिक विकास कामे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णयTwitter : @therajkaran छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस […]

महाराष्ट्र राष्ट्रीय

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करावा

स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण या विषयावरील परिसंवादात मागणी Twitter : @therajkaran मुंबई : स्त्रीवादी धोरणामुळे स्त्रियांना संरक्षण मिळेल. सर्व क्षेत्रांशी निगडित स्त्रीवादी धोरण तयार करणे आवश्यक आहे. समाजातील पुरुष मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील मुद्द्यांची राज्य सरकार दखल घेणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. परदेशातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी – विजय वडेट्टीवार

Twitter : @therajkaran मुंबई छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शनिवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा ट्रिपल इंजिन सरकारने मोडीत काढली असून मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मु्क्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र एकनाथ शिंदे यांचा मुक्काम ३२ हजार रूपये भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार आहे. यावरून विधानसभा विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही….!

Twitter : @NalavadeAnant मुंबई: केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया आघाडीने माध्यम स्वातंत्र्याच्या गळचेपीची हुकूमशाही मानसिकता दाखवून दिल्याची घणाघाती टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. इंडी आघाडीचा बहिष्काराचा पवित्रा म्हणजे माध्यमक्षेत्राला थेट धमकीचा इशारा असून पत्रकारांनी, पत्रकार […]